Shampoo केल्यानंतर सुद्धा केस राहतात चिपचिप ? वाचा सविस्तर  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shampoo केल्यानंतर सुद्धा केस राहतात चिपचिप ? वाचा सविस्तर

जाणून घेवूया केसांचा तेलकटपणा कसा दूर करता येईल.

दैनिक गोमन्तक

पावसाळ्याच्या दिवसांत (Rainy days) वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. यामुळे फक्त त्वचाच (Skin) नाही तर केससुद्धा (Hair) तेलकट होतात. शॅम्पू (Shampoo)केल्यानंतर केस एक - दोन दिवस चांगले राहतात. पण नंतर केस तेलकट (Oily) आणि चिपचिप (Sticky) दिसू लागतात. याचे कारण म्हणजे आपल्या केसांच्या मुळामधून तेल जास्त प्रमाणात बाहेर येणे. चला तर मग जाणून घेवूया केसांचा तेलकटपणा कसा दूर करता येईल.

एक ग्लास पाणी आणि एक ते दोन चमचा चहा पावडर एका भांड्यात टाकून 15 मिनिटे उकळून घ्यावे. यानंतर पाणी थंड झाल्यानंतर चाळणीने गाळून घ्यावे. हे पाणी केसांच्या मुळांत लावावे. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवावे. असे आठवड्यातून दोन वेळा केल्याने केसांची चमक वाढते आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते.

केसांतील तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही पेरूच्या पानांचा देखील वापर करू शकता. यासाठी पेरूची पाने पाण्यात उकळून घ्यावीत. हे पाणी थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांमध्ये लावावे. एका तासानंतर केस स्वच्छ धुवावे. यामुळे केसांमधील तेलकटपणा कमी होऊन केस गळणे कमी होते.

केसांमधील तेलकटपणा कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. एक कप पाण्यामध्ये 3 ते 4 सफरचंदच्या फोडी करून त्यावर व्हीनेगर टाकावे. हे केसांच्या मुळांवर लावावे. एका तासानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्यास केस मुलायम होतात आणि केसांतील तेलकटपणा कमी होतो.

कढीपत्यांची पाने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी दही आणि कढीपत्यांच्या पानांची पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट केसांच्या मुळात लावावी. एका तासानंतर केस शॅम्पूने धुवावे. यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळते. तसेच केसांमधील तेलकटपणा कमी होऊन केस मुलायम होतात.

केसांमधील तेलकटपणा कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा. यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये दोन टोमॅटोच रस मिक्स करावा. ही पेस्ट केसांच्या मुळात चांगली लावावी. एका तासानंतर केस शॅम्पूने धुवावे. यामुळे केसांमधील तेलकटपणा कमी होऊन केस मुलायम आणि चमकदार होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT