GAS.jpg
GAS.jpg 
लाइफस्टाइल

संध्याकाळच्या जेवणानंतर गॅसचा त्रास होतो का? जाणून घ्या कारण आणि उपाय

गोमंन्तक वृत्तसेवा

आजकाल मानवाच्या जीवनशैलीत फास्ट फूड(Fast food) खाद्यपदार्थांचा (Food) समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यात अनेक लोक व्यायाम करणे टाळतात. यामुळे रात्री झोपताना अनेकांना अस्वस्थ वाटते. त्यामुळे झोपही व्यवस्थित लागत नाही आणि पचनही नीट होत नाही. खरतरं ही समस्या पोटात गॅस निर्माण झाल्यामुळे होते. बऱ्याचदा काही लोक गॅसच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण कधी कधी ही समस्या गंभीर होते. 

शरीरामधून गॅस पास झाला नाही तर झोप व्यवस्थित लागत नाही. एवढच नाही तर पोट दुखीचाही त्रास जाणवायला सुरुवात होते. आपल्याला काही खाण्याची इच्छा देखील होत नाही. पोटामध्ये जळजळ होते. रात्री झोपायला गेल्यानंतर लोकांना गॅसची समस्या होत असल्याचे  मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. नेमके हे का होते आणि गॅसच्या समस्या कशी दुरु करु शकतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

शरीरामध्ये अन्न पचनाची प्रक्रिया सुरु असताना गॅसची निर्मिती होते. जर तुम्ही पचणास जड असलेल्या पदार्थाचे सेवन केले तर गॅस मोठ्या प्रमाणात निर्माण तयार होतो. किंवा आपण रात्रीच्या वेळी गरजेपेक्षा जास्त जेवण केल्यानंतर ही समस्या उद्भवू शकते.

गॅसची समस्या टाळण्यासाठी रात्री काय करावे
1 साधारणत: हा अन्न पचनास जवळपास 6 तास लागतात. त्यामुळे झोपेच्या सुमारे 3 तासाच्या आगोदर जेवण करा.

2 ज्यांना काही रात्री गॅस होण्याची समस्या आहे त्यांनी रात्री हलका आहार घ्यावा.

3 रात्रीच्या वेळी फायबरचे (Fiber) प्रमाण जास्त असलेले खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे. कारण त्यांना पचणास वेळ लागतो आणि गॅस देखील तयार होतो. मटार, सोयाबीन, सफरचंद (Apple), भाज्या यांचे सेवन करणे टाळावेत यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

4 रात्रीचे जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने थोडावेळ बाहेर फिरायला जावे.

5 पाणी भरपूर प्यावे. दिवसभरात कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी घ्यावे.

6 दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सहा तासांचे अंतर पाहिजे. हे अंतर कमी किंवा जास्त असेल तर गॅस होण्याची समस्या जास्त असते. 

7 उपाशी राहिल्यास गॅस होण्याची समस्या जास्त असते. त्यामुळे रात्री किंवा मध्येच भूक लागली तर काही हेल्दी खावे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

SCROLL FOR NEXT