Bhadrasana
Bhadrasana 
लाइफस्टाइल

कंबरदुखीचा त्रास दुर करण्यासाठी करा भद्रासन

गोमन्तक वृत्तसेवा

शारीरिक व्याधींवर मात करायची असेल तर योगासनांचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. योग केल्यामुळे अनेकांच्या शारीरिक व मानसिक समस्या दूर झाल्याचं आपण साऱ्यांनीच ऐकलं आहे. साधारणपणे वयाची 35 वर्षे ओलांडली की कंबरदुखी, पायदुखी अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच योगासनांच्या सरावामध्ये भद्रासन नियमितपणे जरूर करा.

भद्रासन करण्याचे फायदे
1. मांडीचे स्नायू लवचिक होतात.
2. मांडीजवळील भागांचे स्नायू ताणले जातात.
3. ओटीपोटातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.
4. कमरेखालील सांधे मोकळे होतात.
5. या आसनात मांड्या व पोटऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे मांडी, जांघा आणि पार्श्वभाग यांच्यावर ताण येऊन येथील स्नायू बळकट होतात.
6. भद्रासन ही ध्यानाची बैठक तयार करण्यासाठीचे सर्वात उत्तम आसन आहे.

भद्रासन कसे करावे 
प्रथम जमिनीवर पाय पसरुन बसा. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडा. दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशा पद्धतीने बसा. त्यानंतर दोन्ही हातांनी पायांचे चवडे पकडून स्वत:च्या दिशेने ओढा. मात्र, यावेळी पाय जमिनीला स्पर्श करतील याची काळजी घ्या. तसंच हे आसन करताना पाठीचा कणादेखील ताठ राहिल याकडे लक्ष द्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

SCROLL FOR NEXT