Diwali 2023  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2023: मिठाईसाठी माव्यात भेसळ कशी ओळखायची? वाचा सविस्तर

दिवाळी असो वा इतर कोणताही सण असो मिठाईशिवाय तो पूर्ण होत नाही. या सणांमध्ये मिठाईला जास्त मागणी असल्याने भेसळयुक्त माव्याची मिठाई विकली जाते.

Puja Bonkile

Diwali 2023: दिवाळी हा दिव्यांचा आणि स्वादिष्ट पदार्थांचा सण आहे. देधभरात मोठ्या उत्साहात हा सण आनंदात साजरा केला जातो. भरपूर मिठाई, पदार्थ आणि विविध प्रकारचे स्नॅक्स घरी तयार केले जातात. आपला कोणताही सण मिठाईशिवाय पूर्ण होत नाही. विशेषतः दिवाळी. या सणांमध्ये अनेक लोक बाजारातून मिठाई आणतात. अनेक मिठाई माव्यापासून बनवल्या जातात. पण सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मावा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मिठाईला जास्त मागणी असल्याने भेसळयुक्त मावा मिठाई विकली जाते. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशावेळी भेसळयुक्त मावा कोणत्या गोष्टींवरून बनवला जातो आणि तो आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे जाणून घेऊया.

भेसळयुक्त माव्यात काय मिक्स केलेले असते

1. भेसळयुक्त माव्यामध्ये कमी दर्जाची दूध पावडर, टॅल्कम पावडर, चुना, खडू आणि पांढरे रसायने यासारख्या धोकादायक गोष्टींची भेसळ केली जाते.

2. बनवाट मावा बनवण्यासाठी युरिया, डिटर्जंट पावडर आणि निकृष्ट दर्जाचे वनस्पती तूप दुधात मिक्स केले जाते.

3. सिंथेटिक दूध तयार करण्यासाठी मावा वॉशिंग पावडर, शुद्ध तेल, पाणी आणि शुद्ध दूध मिक्स करून तयार केले जाते.

4. काही ठिकाणी रताळे, पाणी तांबूस पिठ, मैदा किंवा बटाटा देखील माव्यामध्ये जोडला जातो. माव्याचे वजन वाढवण्यासाठी बटाटा आणि स्टार्चही टाकला जातो.

नकली मावा कसा ओळखायचा

1. माव्यात थोडी साखर मिसळून गरम करा. जर ते पाणी सोडू लागले तर याचा अर्थ माव्यात भेसळ आहे.

2. अंगठ्याच्या नखेवर मावा चोळल्याने तुपाचा वास येत नसेल तर तो बनावट आहे.

3. खव्याचे गोळे बनवल्यानंतर ते फुटायला लागले तर समजून घ्या की मावा भेसळयुक्त आहे.

4. खरा मावा तोंडाला चिकटत नाही, तर नकली मावा तोंडाला चिकटतो.

5. खरा मावा खाल्ल्याने तोंडाला कच्च्या दुधासारखी चव येते.

6. दोन ग्रॅम मावा 5 मिली गरम पाण्यात विरघळवून थंड होऊ द्या. यानंतर त्यामध्ये टिंचर आयोडीन घाला. बनावट खव्याचा रंग निळा होईल.

वाईट मिठाईपासून आपल्या आरोग्याचे रक्षण कसे करावे

रंगीबेरंगी मिठाई खाणे टाळा. त्यात सिंथेटिक रंग वापरले जातात.

नेहमी प्रसिद्ध दुकानातूनच मावा किंवा मिठाई खरेदी करावी.

मावा दोन दिवसांपेक्षा जुना असेल तर अजिबात खरेदी करू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT