Diwali 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2023: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Diwali 2023: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.

Puja Bonkile

Diwali 2023: दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. दिवाळी हा हिंदु धर्माचा एक प्रमुख सण आहे, जो केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो.

मान्यतेनुसार दसऱ्याच्या 20 दिवसांनी दिवाळी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा तो 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.

घराची साफसफाई

दिवाळीपूर्वी घरांची साफसफाई करावी. देवी लक्ष्मीबद्दल धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की माता लक्ष्मी स्वच्छ असलेल्या ठिकाणी निवास करते किंवा त्या ठिकाणी जाणे पसंत करते. जेथे स्वच्छता नसते तेथे माता लक्ष्मी जात नाही.

घराला रंग द्यावा

दिवाळी निमित्त तुम्ही घराच्या भिंतींना नवा रंग देऊ शकता. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. घरातील वातावरण प्रसन्न राहते.

रांगोळी काढावी

दिवाळीला घरे विविध रंगीत लाइटिंगने सजवले जाते. फुलं आणि पानांनी सजावट केली जाते. पणत्या लावल्या जातात. सुंदर रांगोळी काढली जाते. दिवाळीला रांगोळी काढण्याची परंपरा जुनी आहे. त्याचा संबंध वास्तुशीही आहे. रांगोळी काढल्याने घरात कोणताही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

माता लक्ष्मीचा मुर्ती

दिवाळी पूजेसाठी माता लक्ष्मीची मुर्ती घरात आणावी. मनोभावे माता लक्ष्मीची पुजा करावी.

कलश स्थापना

दिवाळीला माता लक्ष्मीची पूजा सुरू करण्यापूर्वी कलशाची स्थापना करण्याची परंपरा आहे. तांदूळाच्या मध्यभागी तांबे, पितळ किंवा चांदीचा कलश ठेवावा. 3/4 भांडे पाण्याने भरावे आणि त्यात झेंडूची फुले आणि तांदळाचे काही दाणे घालावे. एक नाणे व १ सुपारी ठेवावी. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाच पाने ठेवावी.

लक्ष्मी-गणेश मूर्ती

दिवाळीत माता लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मी-गणेशजींची मूर्ती किंवा फोटो मध्यभागी ठेवा. लक्षात ठेवा की मूर्ती कलशाच्या नैऋत्य दिशेला ठेवावी. यानंतर तांदळाचे छोटे ताट देवी लक्ष्मीसमोर ठेवावो आणि तांदळावर हळद लावून कमळाचे फूल अर्पण करावे. तुम्ही नाणी, नोटा, सोन्याची नाणी, दागिने इत्यादी देखील ठेवू शकता.

तुपाचा दिवा लावावा

दिवाळीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. असे मानले जाते की असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. लक्ष्मीच्या पायावर हळद किंवा टिळा लावावा. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा लावणे शुभ मानले जाते.

लक्ष्मी मंत्र

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी मंत्र जप करणे देखील विशेष फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी सर्वात खास असते.

दिवाळी प्रसाद

माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीला तांदळाचे धान्य आणि फुले अर्पण करा. पाणी अर्पण करावे.

मांसाहार करू नये

दिवाळीच्या दिवशी मांसहार करणे टाळावा. असे करणे शुभ मानले जात नाही. माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघुन जाते. यामुळे सात्विक पदार्थांचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT