Diwali 2021: दिवाळीपूर्वी या गोष्टीची करा खरेदी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2021: दिवाळीपूर्वी 'या' वस्तु करा खरेदी

दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदस साजरा केला जात असून या दिवशी वस्तु खरेदी करण्याची परंपरा आहे.

दैनिक गोमन्तक

दिवाळीचा पाच दिवसांचा सण धनत्रयोदशीपासूनच सुरू होतो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदस साजरा केला जातो. या दिवशी वस्तु खरेदी करण्याची परंपरा आहे. पण जेव्हा एखादी वस्तु शुभ मुहूर्तावर खरेदी केली जाते, तेव्हा त्याचे महत्व आणखी वाढते. यंदा 60 वर्षांनंतर असा शुभ योगायोग तयार होत आहे, ज्यामध्ये कोणतीही वस्तु खरेदी करणे फलदायी ठरणार आहे.

* 60 वर्षे नंतर आलाय अद्भुत योगायोग

ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, दिवाळीपूर्वी खरेदीसाठी यावेळी महामुहुर्त गुरु पुष्य नक्षत्र शनि- गुरूच्या संयोगात येत आहे. जो एक दुर्मिळ योगायोग मानला जात आहे. पंचांगानुसार , 28 ऑक्टोबर 2021 रोजी मकर राशीमध्ये शनि-गुरुची जोड असेल. हे संयोजक पुष्प नक्षत्राच्या शुभतेला अधिक बळ देणार आहे. या दिवशी म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी सर्वसिद्धी योग देखील सकाळी 6:33 ते 9:42 पर्यंत असेल. या वेळात खरेदी करणे शुभ मानले जाणार. ज्योतिषशास्त्रानुसार, पुष्प नक्षत्रांचे स्वामी आणि त्यांचे उप- गुरु यांचे हे संयोजक ग्रहाच्या संक्रमानांमध्ये सुमारे 60 वर्षांनंतर तयार होत आहे. यापूर्वी हा दुर्मिळ योगायोगा 1961 साली झाला होता.

* या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाणार

गुरु पुष्प नक्षत्रात शनि- गुरूचे संयोजन म्हणजे सोने , चांदीचे दागिने, घर, जमीन, सोन्या-चांदीचे नाणे, कार, लाकडी किंवा लोखंडी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पाण्याची मोटार यासारख्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT