Health  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health: हवामानबदलामुळे वाढत आहेत आजार, जाणून घ्या कोणती आहेत लक्षणे

Health: गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Health: सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे.दिवसभर मोठ्या प्रमाणात ऊन असते आणि पहाटे थंडी जाणवते. गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. या बदललेल्या विषम हवामानाचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला ,अंगदुखी , डोकेदुखी असे आजार बळावताना दिसत आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्दी ,ताप ,खोकला ,अंगदुखी, डोकेदुखी ,मळमळ ,थकवा येणे ही ठळक लक्षणे आहेत.त्याचबरोबर,संवेदनशिल त्वचा असलेल्या व्यक्तींना त्वचेचे आजार होऊ शकतात.त्वचा तडतडणे, त्वचा काळवंडणे अशा व्याधी त्यातून निर्माण होण्याचा धोका वाढतो, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

जाणून घेऊयात कोणती आहेत लक्षणे

1. श्वसनाचे विकार: सकाळी थंडीमुळे हवेतील प्रदूषक जमिनीलगत असतात.त्यामुळे दमा आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांचा त्रास वाढण्याचा धोका असतो. त्यातून खोकल्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

2. पोटाचे विकार: दुपारी उन्हाचा वाढल्याने भर उन्हात पाणी पिण्यात येते,तसेच शीतपियांच्या दुकांनावर गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे.या ठिकाणी स्वच्छता नसल्याचा पोटाचा त्रास होण्याचा शक्यता वाढते.त्यातून मळमळ ,उलट्या , जुलाब होतात.

3. ताप, सर्दी, खोकला : कमाल आणि किमान तापमानातील फरकामुळे सर्दी,ताप , खोकल्याचे रुग्ण वाढले असल्याचेही निरिक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT