Eyes Health

 
Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'या' गोष्टींचा आहारात करा समावेश डोळ्यांची दृष्टी सुधारेल

डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. तर..

दैनिक गोमन्तक

आजच्या जीवनशैलीत कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या किंवा लहान मुलाच्या डोळ्यांवर चष्मा दिसणे सामान्य झाले आहे. मग ती संगणकावर काम करणारी व्यक्ती असो वा मोबाईलवर गेम खेळणारी मुल. इतकेच नाही तर कधी कधी दोन-तीन महिन्यांच्या बाळाच्या डोळ्यांवरही चष्म्या पाहायला मिळतो. याचे कारण म्हणजे गरोदर महिलांना पुरेसे पोषक तत्व मिळत नाहीत.

डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. तर मग जाणून घेऊया डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो.

आहारात सोयाबीनचा समावेश करा

डोळ्यांचे आरोग्य (Health) सुधारण्यासाठी सोयाबीन खूप मदत करते. दृष्टी वाढवण्यासाठी सोयाबीन खूप फायदेशीर मानले जाते. कारण सोयाबीनमध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात. जे डोळ्यांच्या () आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

गाजराचा रस प्या

दृष्टी सुधारण्यासाठी रोजच्या आहारात गाजराचा रस देखील समाविष्ट केला जाऊ शकतो. गाजरात व्हिटॅमिन (Vitamins) सी मुबलक प्रमाणात आढळते. जे दृष्टी सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हिवाळ्यात गाजर बाजारात सहज उपलब्ध होते.

फळे खा

सुका मेवा देखील दृष्टी वाढवण्यासाठी खूप मदत करतो. यामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळते, जे डोळ्यांच्या (eyes) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात सुक्या फळांचा समावेश करू शकता.

दृष्टी सुधारण्यासाठी हिरव्या भाज्या खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. हिरव्या भाज्या एक नाही तर अनेक पोषक तत्वांनी भरलेल्या असतात. ते केवळ एकच नव्हे तर इतर अनेक फायदे देखील शरीराला देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

SCROLL FOR NEXT