Diarrhea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diarrhea: जर तुम्ही डायरियाच्या समस्येने त्रस्त असाल तर 'या' घरगुती उपायंचा करा वापर

Home Remedies For Diarrhea: जर तुम्हालाही डायरियाचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपचार करू शकता.

Puja Bonkile

Diarrhea treatment home remedies

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी, बदलते वातावरण, अस्वच्छ पाणी किंवा असंतुलित शारीरिक हालचाली अशा अनेक कारणांमुळे लोकांना अतिसाराचा सामना करावा लागतो. ही समस्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच होऊ शकते.

यामुळे आतड्याची हालचाल खूप पातळ होते, ज्यामुळे तुमच्या शरीरातून भरपूर पाणी निघून जाते आणि पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या देखील वाढते. अतिसारावर त्वरित उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही 5 घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

भरपुर पाणी प्यावे

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, जर तुम्हाला अतिसार होत असेल तर तुम्हाला भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. अतिसाराचा त्रास असलेल्या प्रौढांनी पाणी, फळांचे रस, कॅफीनमुक्त सोडा इत्यादी पिणे सुरू करावे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरूषांसाठी एका दिवसात सुमारे 3.7 लिटर आणि महिलांसाठी 2.7 लिटर पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

केळी खावी

केळी खाल्ल्याने डायरियापासून आराम मिळतो. केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते आणि त्यामुळे डायरिया कमी होतो. याशिवाय केळी जास्त काळ पोटात राहू शकते. यामुले पोट भरल्यासारखे देखील राहते. अशक्पणा येत नाही. जर तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही याचे सेवन करू शकता.

लिंबूपाणी प्यावे

अतिसारामुळे तुमच्या शरीरातून भरपूर पाणी वाया जाते. यामुळे ग्लुकोजची गरज असते. त्यामुळे बाहेरचे ग्लुकोज पावडरवर न पिता उकळलेल्या आणि थंड केलेल्या पाण्यात साखर, मीठ आणि लिंबू मिक्स करून सेवन करावे. यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल आणि ही समस्या लवकरच दूर होईल.

आल्याचे सेवन करावे

आयुर्वेदानुसार आल्याचा वापर करून अतिसाराची समस्या कमी करू शकता. खरं तर, याचा उपयोग मोशन सिकनेस, गर्भधारणेशी संबंधित अस्वस्थता आणि सर्जरी किंवा केमोथेरपीनंतर मळमळ कमी करण्यासाठी केला जातो.

पुढील पदार्थांचे सेवन टाळावे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अतिसाराच्या वेळी तुम्ही काही खाद्यपदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे आहे. कारण अशावेळी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामध्ये जास्त चरबीयुक्त पदार्थ, चिकन, मसालेदार पदार्थ, कृत्रिम गोड पदार्थ असलेले पदार्थ किंवा उच्च पातळीचे फ्रक्टोज असलेले पदार्थ यांचा समावेश होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT