These two states are becoming the bastion of cancer  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Care Tips:....सावधान! मधुमेही रुग्णांना कॅन्सरचा धोका जास्त असतो

Diabetes Care Tips: या कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात.

दैनिक गोमन्तक

Diabetes Care Tips: दरवर्षी मोठ्या संख्येने लोक मधुमेहाचे बळी ठरत आहेत. आज संपूर्ण जग मधुमेहाच्या विळख्यात आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे आता मुलांनांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना मधुमेह होत आहे.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोलन कॅन्सरचा धोकाही वाढत असल्याचे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, मधुमेह हा सर्वात धोकादायक आहे कारण इतर अनेक रोग त्याच्या पाठोपाठ येतात. मधुमेहाची बाधा झाल्यानंतर डोळ्यांपासून मूत्रपिंड, यकृत आणि हृदयापर्यंतच्या आजारांचा धोका वाढू शकतो.

जाणून घ्या मधुमेहामुळे कर्करोगाचा धोका कसा वाढतो?

कोलन कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात. मधुमेहाने ग्रस्त लोकांमध्ये कोलोरेक्टल (कोलन) कर्करोगाचा धोका 47 टक्क्यांपर्यंत जास्त असू शकतो. त्यामुळे मधुमेहाबाबत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा टाळावा.

योग्य वेळी तपासणी करा

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरची प्रकरणे गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढली आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेही रुग्णांमध्ये या कर्करोगाची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून हा जीवघेणा धोका वेळीच टाळता येईल.

असे केले जाते कर्करोगाचे निदान

कोलोनोस्कोपी प्रक्रियेद्वारे, रुग्णाच्या संपूर्ण मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते. या प्रक्रियेदरम्यान, कोलोनोस्कोप नावाची एक विशेष प्रकारची लांब आणि लवचिक ट्यूब वापरली जाते. मधुमेही रुग्णांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी तपासणी केली पाहिजे, जेणेकरून या कर्करोगाची शक्यता वेळीच ओळखता येईल आणि तो टाळता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT