Diabetes Diet Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Diet Tips: या पांढऱ्या पदार्थांचे सेवन टाळावे

मधुमेह हा आजार सकस आहार घेवून नियंत्रित ठेवता येतो.

दैनिक गोमन्तक

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोज सतत वाढतच जाते. मधुमेहावर कुठलाही उपचार नाही हा आजार फक्त आहारावर (Food) नियंत्रण ठेवूनच केला जातो. यासाठी आम्ही तुम्हाला आज असे पदार्थ सांगणार आहोत ज्यामुळे मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवता येईल.

भात:

ब्रिटिश मेडिकल जर्नलरमधील एका अभ्यासात असे दिसून आले की जे लोक पांढऱ्या भाताचे सेवन करतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. याचा अर्थ असा की तुम्हाला प्री-डायबीटीज असेल तर तुम्ही भात (Rice) खाण्याचा विचार करावा. पांढऱ्या तांदळात उच्च ग्लायसेमिक इडेक्स असतो, याचा अर्थ ते रक्तातील साखर वाढबवू शकतात.

पास्ता:

पास्ता (Pasta) हा पदार्थ सॉस, क्रीम, चीज आणि भरपूर बटर घालून बनवला जातो. यामुळे तुम्हाला 1000 कॅलरीज, 75 ग्रॅम फॅट आणि सुमारे 100 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळतो. पास्ता मैद्यापासून बनवला जातो यामुळे आपल्या शरीरातील शुगरचे प्रमाण वाढू शकते. तसेच लठ्ठपणा देखील वाढू शकतो.

बटाटा:

हा पदार्थ जवळजवळ सर्वांच आवडतो. बटाट्यामध्ये एकूण 97 कॅलरी, 22.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 0.1 ग्रॅम चरबी, 1.6 ग्रॅम प्रथिने आणि 0.4 ग्रॅम फायबर प्रति 100 ग्रॅम प्रदान करतात. बटाट्यातील (Potato) एकूण कॅलरीजपैकी 98% कर्बोदकांमधे येतात. यामुळे बटाटा खाणे मधुमेह (Diabetes) असणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

* पांढरी ब्रेड

पांढरी ब्रेड पांढऱ्या पिठापासून बनवली जाते. यात रिफाइंड स्टार्चचे प्रमाण अधिक असते. या गोष्टी साखरेप्रमाणे काम करतात आणि लवकर पचतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी पांढऱ्या ब्रेडचे सेवन टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT