Depression In Kids Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Depression In Kids: तुमचा निष्काळजीपणा ठरु शकतो मुलांच्या डिप्रेशनचे कारण

लहान मुले झोपण्यापूर्वी बेडवर स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. लहान मुलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढत चालले आहे.

दैनिक गोमन्तक

Depression In Kids: लहान मुले असोत वा वडीलधारी मंडळी, आजकाल स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पण त्याचे एडिक्शन मुलांमध्ये दिसून येत आहे. 

याचे एक कारण म्हणजे कोरोना महामारी आहे. कारण जेव्हा लॉकडाऊन (Lockdown) झाला तेव्हा मुले मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर फक्त ऑनलाइन क्लासेससाठी करत होते. 

पण, आता त्याची गरज संपल्यानंतरही त्याचा वापर थांबलेला नाही. एका अहवालानुसार, 23 टक्क्यांहून अधिक मुले झोपण्यापूर्वी बेडवर स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. 

स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढत आहे. स्मार्टफोन आणि डिप्रेशनचा काय संबंध आहे आणि पालकांच्या निष्काळजीपणामुळे मुलांमध्ये त्याचा वापर कसा वाढला आहे ते समजून घेउया.

  • नैराश्य आणि स्मार्टफोनमधील संबंध

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये सामाजिक अलिप्तता निर्माण झाली आहे. मुले मोबाईलमध्ये इतकी हरवलेली असतात की आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेचे भान नसते. घरात पाहुणे आले तरी त्यांना भेटण्याऐवजी मुलं फोनवरच व्यस्त राहतात, असे अनेकदा दिसून आले आहे. 

याशिवाय फोन वापरल्यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होतात. मुलांना 8 तासांची झोप व्यवस्थित मिळत नाही. यामुळे चिडचिडेपणा फोकसमध्ये कमी राहतो. त्याच वेळी, स्मार्टफोनच्या वापरामुळे, मुले खेळणे आणि बाहेर उड्या मारणे थांबवतात.

म्हणजेच शारीरिक हालचाली कमी होतात, मेंदूचा विकास योग्यरित्या होत नाही, याशिवाय तुमच्या मुलाला चार लोकांमध्ये बोलण्यात संकोच वाटू लागतो आणि या सर्व समस्यामुळे डिप्रेशन वाढू शकते.

  • मोबाईलच्या व्यसनाला पालक जबाबदार

अनेकदा पालक स्वत: आपल्या मुलांना स्मार्टफोन्स देतात आणि त्यांना हे पाहून आनंद होतो की त्यांचे मूल स्मार्टफोनमध्ये ते सर्व करू शकतात जे मोठा माणूस करू शकत नाही. मुल किती हुशार आहे असे त्यांना वाटते. 

पण पुढे जाऊन एक छोटीशी चूक ही वाईट सवय बनते. अनेकवेळा पालकांना असेही सांगावे लागते की, शाळेचे काम पटकन केले तर मोबाइल मिळेल किंवा जेवण खाल्ले तर मोबाइल मिळेल. अशा काही अटी अनेकदा मुलांसमोर ठेवल्या जातात. यामुळे मुलाचे काम लवकर होते, पण त्याचे लक्ष मोबाइलवरच असते.

अनेक वेळा पालक स्वतःच्या ऑफिसच्या (Office) कामात इतके व्यस्त असतात की मुलांना वेळ देता येत नाही. मुलांपासून सुटका करून घेण्यासाठी ते त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. याशिवाय आई-वडील स्वत: मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे तुमच्या पाल्याला त्याचा वापर योग्य वाटतो.

व्यसनापासून मुक्त कसे व्हावे

  • लहान मुलांपासून मोबाईलचे वेड कमी करायचे असेल, तर मलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

  • स्वतः मोबाईल फोनपासून दुर राहा, असे केल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या मुलावर होईल.

  • जर तुमच्या मुलाने सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याचा हट्ट केला तर मोबाईल त्याच्या नजरेपासून दूर ठेवावे.

  • मुलांसोबत वेळ घालवा, त्यांच्यासोबत खेळायला जा, योगासने आणि व्यायाम करा, एकत्र वेळ गालवल्यास मोबाइलपासून दुर राहण्यास मदत मिळते.

  • स्वतःला रात्री झोपताना मोबाईलपासून दूर ठेवा आणि मुलांना त्यापासून दूर ठेवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT