Vegetables Price Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vegetables Price: गोव्यात गावठी पालेभाज्यांना वाढली पसंती

Vegetables Price: टोमॅटोने गाठली पन्नाशी; आले-लसूणही महाग

दैनिक गोमन्तक

Vegetables Price: मागील महिन्याभरात टोमॅटो 30 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता; परंतु मागील काही दिवसांपासून 50 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. मात्र, फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर टोमॅटो प्रतिकिलो 10 रुपये स्वस्तात म्हणजेच 40 रुपये किलो दराने विकला जातोय.

आले-लसूणच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लसूण 400 रुपये किलो दराने विकली जात आहे. आल्याचा दर प्रतिकिलो 150 ते 200 रुपये झाला आहे. हिरवी मिरची, वालपापडी, भेंडी, तसेच पालेभाज्यांचे दरदेखील वाढत आहेत.

गोव्यात येणारा भाजीपाला हा बेळगाववरून येत असल्याने तेथील भाजी मार्केटमध्ये तुटवडा आल्यास त्याचा फटका गोव्याला बसतो; कारण गोव्यात भाजी आणण्यासाठी लागणारी मजुरी, वाहतूक खर्च यामुळे येथे भाज्यांचे दर वाढवावे लागतात.

राज्यात रब्बी हंगामाला सुरवात झाली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या भाज्या व मिरचीची लागवड करण्यात आली आहे. लालभाजी, भेंडी, चिटकी, मुळा तसेच इतर काही भाज्या आता अनेक शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत.

हवामानातील बदल कारणीभूत: यंदा अवेळी पडलेला पाऊस व हवामानात होणारे बदल याचा परिणाम आले, लसूण तसेच इतर भाजीपाल्यावर झाल्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्नात तुटवडा आल्याचे विक्रेते सांगत आहेत. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत राज्यात लसूण तसेच इतर भाज्यांच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सध्याचे दर भाजी

  • कांदा : ४०- २७

  • बटाटा : ४०- २८

  • टोमॅटो: ५०- ४०

  • गाजर: ५०-६०-३४

  • फ्लॉवर: ४०-२८

  • भेंडी: ८०-५४

  • कोबी: ४०-३०

  • मिरची: ८०-५२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT