Dehydration In Winter Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dehydration in Winter: हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने होऊ शकतात गंभीर आजार, दिवसभरात किती प्यावे पाणी?

Dehydration in Winter: थंड वारा आणि कडाक्याच्या थंडीमुळे वृद्ध आणि लहान मुलांमध्ये अनेक प्रकारचे शारीरिक त्रास होऊ लागतात. अशावेळी हिवाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घ्यावी.

Puja Bonkile

Dehydration In Winter: थंड वारा आणि कडाक्याच्या थंडीमुळे वृद्ध आणि लहान मुलांमध्ये अनेक प्रकारचे शारीरिक समस्या वाढू लागतात.

थंडीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. थंडीत पाणी प्यावेसे वाटत नाही हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसू लागतात. 

ऋतू कोणताही असो, तुमच्या शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळाले नाही, तर शरीरात अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम शरीर स्वतः करते. त्याचबरोबर घाण काढण्याचे कामही पाणी करते. पाणी कमी प्यायल्याने शरीर अनेक आजारांना बळी पडू शकते. त्याची सुरुवात डिहायड्रेशनने होते. अशावेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

बद्धकोष्ठता समस्या

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या सुरू होतात. ज्याचा थेट परिणाम पोटावर होतो. बद्धकोष्ठतेपासून गंभीर आजारापर्यंत. अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. 

अशक्त वाटणे

थंडीत पाणी कमी पिल्या जाते. कमी पाणी प्यायल्याने अशक्तपणा सुरू होतो. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर कमजोर होऊ लागते. त्याच वेळी, शरीरात रक्त आणि ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे थकवाही जाणवतो. 

किती प्यावे पाणी

जर तुम्हाला हिवाळ्यातही निरोगी आणि हायड्रेटेड राहायचे असेल तर तुमच्यासाठी दिवसातून 3-4 लिटर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. हे तुम्हाला निरोगी आणि ताजेतवाने ठेवते. दररोज 7-8 ग्लास पाणी प्यावे. 

निस्तेज त्वचा

पाण्याअभावी त्वचा निर्जीव होते. म्हणजे कोरडे होते. त्यामुळे रोज 5-7 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. 

किडनीवर परिणाम

पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवर वाईट परिणाम होतो. किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी लागते. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा किडनीवर जास्त दबाव येतो. त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ होण्याची तक्रार असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT