Curd Remedy  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Curd Remedy : परीक्षा किंवा मुलाखतीपूर्वी का खाल्ले जाते दही-साखर? धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे घ्या जाणून

Curd Remedy Before Exam : दही-साखर खाण्यामागे आणि कपाळावर दह्याची लस लावण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत.

दैनिक गोमन्तक

Curd Remedy : लहानपणी तुम्ही परीक्षा द्यायला जात असता तेव्हा निघण्यापूर्वी तुमच्या आईने तुम्हाला दही-साखर दिले असेल. हे जरी तुम्ही विसरला असाल, तर तुम्हाला ही गोष्ट आठवेल की तुम्ही जेव्हा पहिली मुलाखत द्यायला जात होता, तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला दही-साखर नक्की खेळ दिले होते.

ही एक कौटुंबिक परंपरा आहे. तुम्ही असा विचार करत असाल की या परंपरेमागे केवळ धार्मिक कारण असेल किंवा तुमच्यावर आईचे प्रेम असेल, तर असे नाही. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे आहेत.

(Curd Remedy Before Exam)

शीतलता प्रदान करते

दही-साखर खाण्यामागे आणि कपाळावर दह्याची लस लावण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. अन्न पचण्यास मदत करण्यासोबतच दही अन्न मऊ होण्यासही मदत करते. दुधापासून बनवलेल्या दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, बी-12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात, जे तुम्हाला ऊर्जावान बनवतात.

साखर किंवा पेड्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे काम करतात. रक्ताभिसरणाद्वारे हे रक्त मेंदूपर्यंत पोहोचून स्मरणशक्ती मजबूत होते. कपाळावर दही लस लावल्यास थंडावा मिळतो आणि विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा व्यवस्थित देता येते.

आयुर्वेदिक कारण

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्याची गरज असते आणि आयुर्वेदानुसार दही शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. तसेच साखर ही ग्लुकोजची महत्त्वाची पूरक मानली जाते. जेव्हा आपण या दोन गोष्टी एकत्र खातो तेव्हा यामुळे आपले शरीर थंड राहते आणि विश्रांती मिळते तसेच दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जाही मिळते.

अशा स्थितीत परीक्षा असो की नोकरीची मुलाखत, चिंता आणि तणाव अशा परिस्थितीत दही आणि साखर खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळते. हे एकाग्रता राखण्यासाठी उपयुक्त ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT