Cosmetics Products Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Product: 'या' ब्युटी प्रोडक्टमध्ये असू शकतात धोकादायक केमिकल्स! वापरण्यापूर्वी घ्या काळजी

अनेक मेकअप प्रोडक्टमध्ये केमिकल्यचा वापर केला जातो,यामुळे कोणते प्रोडक्ट वापरणे टाळावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Beauty Product: अनेक महिला डोळे, केस, चेहरा, सुंदर दिसण्यासाठी विविध ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण या ब्युटी प्रोडक्टमध्ये अनेक केमिकल्स असतात. यामुळे आपली त्वचा, केस, डोळे खराब होऊ शकतात. यामुळे असे काही ब्युटी प्रोडक्ट्स आहेत जे महिलांनी वापरणे टाळले पाहिजे

  • वॉटरप्रूफ मस्करा

वॉटरप्रूफ मस्कऱ्याचा वापर डोळे सुंदर दिसण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का या मस्कऱ्यामध्ये पीएफएएस घातक केमिकल असतो. या केमिकलमुळे मेंदु आणि डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो. यामुळे तज्ञांच्या मते वॉटरप्रूफ मस्कऱ्याचा अतिवापर करू नये.

Mascara
  • ड्राय शॅम्पू

ड्राय शॅम्पूचा वापर केस मुलायम आणि चमकदार दिसण्यासाठी केला जातो. पण यामध्ये बेंझिन नावाचे हानिकारक केमिकल असते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. बेंझिन या घटकाचा संपर्क पांढऱ्या रक्तपेशींशी येतो. यामुळे ड्राय शॅम्पूचा वापर जास्त करू नये .

Shampoo
  • हेअर स्ट्रेटनर प्रोडक्ट

केसांना सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनर प्रोडक्टचा वापर केला जातो. पण यामध्ये असलेल्या केमिकलमुळे कर्करोग वाढू शकतात. या प्रोडक्टमध्ये डिम्बग्रंथी आणि स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे तुम्हीही असे प्रोडक्ट वापर असाल तर आजच वापरणे बंद करा.

healthy hair

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT