Corona Virus Women start this business at home and earn thousands of rupees 
लाइफस्टाइल

Corona Virus : महिलांनो  'हे' व्यवसाय घरीच सुरू करा आणि कमवा हजारो रुपये  

दैनिक गोमंतक

देशात कोरोना संसर्गाच्या (Corona infection) वाढत्या प्रादुर्भावमुळे नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. या विषाणूचा संसर्ग (Corona infection)आटोक्यात आणण्यासाठी देशात संचारबंदी (Lockdown) जारी करण्यात आली. परिणामी, अनेकांना आर्थिक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. परंतु, या काळात गृहिणी घरीच बसून त्यांच्या नवऱ्यावरील खर्चाचा भार कमी केउ शकतात. अनेक महिलांनी घरी राहून छोटे-मोठे व्यवसाय सुरू केलेत आहे. तर, अनेक महिलांना नेमका कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न पडतो. तसच अनेक महिलांना भांडवलाची समस्या असते. कोणताही व्यवसाय करायच म्हटले की त्याकरिता भांडवल लागते. परंतु, आज तुम्हाला अशा काही व्यवसायांची माहिती देणार आहोत, जे गृहिणी घरीच बसून , कोणत्याही भांडवलाशिवाय करू शकतात.   (Corona Virus: Women start this business at home and earn thousands of rupees)

तंत्रज्ञानाच्या काळात प्रत्येक गोष्टी या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. घरच्या किराणा मालापासून ते घरातील फर्निचरपर्यंत सगळ ऑनलाइन पद्धतीने सहज मागवता येऊ शकते. यामुळे महिलांनी इंटरनेट वापरण्याची योग्य ती पद्धत शिकून घेतली तर , नक्कीच घरबसल्या हाऊसवाइफ वरुण बिझनेस वुमन होऊ शकतात. तसेच अशी अनेक कामे आहेत जी महिला सहज करू शकतात.   


 - टिफिन सर्व्हिस 

टिफिन सर्व्हिस  ही कधीही बंद न होणारा व्यवसाय आहे. जर तुम्हाला स्वयंपाक करायची आवड असेल आणि तुमच्या हाताला चव असेल तर तुम्ही बिनधास्त हा
 व्यवसाय करू शकता. आज अनेक लोक नोकरीनिमित्त, शिक्षणासाथी घरापासून दूर राहत आहेत. आशा लोकांसाठी तुम्ही जेवणाचे डब्बे पुरवू शकता. 

- शेअर बाजार 

कोरोना काळात अनेकांचा कल शेअर्स ट्रेंडिंग करण्याकडे वाढला आहे. जर तुम्हाळ देखील शेयर बाजारात इंट्रेस्ट असेल किंवा नफा - तोटा याच गणित कळत असेल तर 
तुम्ही हा व्यवसाय अवश्य करू शकता. परंतु,  त्यासाठी पहिले तुम्हाला शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक परवाना काढावा लागतो. त्यानंतरच तुम्ही शेअरमध्ये एजंट म्हणून काम करू शकता. 

- लघुउद्योग 

आपल्या देशात कित्येक काळापासून अनेक गृहिणी घरी बसून लघुउद्योग करत आहेत. हा व्यवसाय प्रत्येक गृहिणीसाठी उत्तम आहे. कारण त्यातून चार पैसे कमवता येतात. 
महत्वाचे म्हणजे आता लघुउद्योग करणाऱ्या महिलांसाठी अनेक योजना करण्यात आल्या आहेत. त्याचाही फायदा होऊ शकतो. पूर्वी लघुउद्योग म्हटल की पापड - लोणची करणे, मसाले बनवणे, अशी कामे केली जात होती. परंतु , आता बदलत्या वेळेनुसार , याचा देखील स्वरूप बदलेल आहे. आता जुन्या गोष्टी ऑनलाइन विकणे, कापड्याचा ऑनलाइन वायसे करणे, असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहे.     


-  वेबसाईट डिझाईन

आजच्या तंत्रज्ञांच्या काळात जर तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचं असेल तर त्यासाठी वेबसाइट ही आवश्यक असते. या वेबसाइटमध्ये कंपनीची पहिली प्रतिमा असते. यामुळे वेबसाइट चांगल्या प्रकारे डिझाइन व्हावी अशी सगळ्यांची इच्छा असते. यामुळे जर तुम्हाला वेब डिझाईनमध्ये आवड असेल तर हे व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम आहे. घरीच बसून तुम्ही अनेक कंपन्यांचे कॉट्रँक्ट घेऊ शकता. अनेक कंपण्यासाठी वेबसाईट डिझाईन करून देऊ शकता. विशेष म्हणजे अनेकांना वेबसाईट डिझाईन करणे खर्चीक वाटते. परंतु तुम्ही जर योग्य दर लावले तर कंपन्यां तुमच्याचकडे आकर्षित होतल.  


- सेल्फ पब्लिश बूक  

अनेक महिलांना लिहिण्याची आवड असते. त्यांच्यासाठी हे क्षेत्र उत्तम आहे. अमेझॉन ही अशीच संधी देणारी एक साईट आहे. अमेझॉन किंडल डायरेक्ट पब्लिशिंग  नावाचे एक फीचर चालवते. यात कोणतेही ऑनलाइन बूक लिहून त्याला  किंडल बूकस्टोअरवर टाकू शकता. याच्या विक्रीवर 70 टक्के रॉयल्टी मिळते. साईट आणि सेल्फ पब्लिश बूकच्या माहितीसाठी https://kdp.amazon.com वर क्लिकवर क्लिक करून अकाऊंट तयार करू शकता. त्यावर तुम्ही रेग्युलर मेंबरदेखील बनू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT