Cooking Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Tips: घरीच मोमोज बनवताय? मग पीठ मळताना 'या' गोष्टी करा

Momos: बाहेरचे मोमोज् खाल्यापेक्षा तुम्ही गरीच चवदार मोमोज् बनवून आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

cooking tip how to make momos dough

मोमोजचे नाव वाचताच तोंडाला पाणी सुटणार नाही असे होणार नाही. मोमोज हा एक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये फक्त एक नाही तर अनेक प्रकार आहेत. हे लोकप्रिय खाद्यपदार्थ आधी फक्त नेपाळमध्येच खाल्ले जात असले तरी आता ते संपूर्ण भारतात आवडीने खाल्ले जाते.


जर तुम्हालाही स्नॅक्समध्ये हलके काही खायचे असेल तर तुम्ही मोमोज बनवू शकता. पण बरेच लोक ते खाणे टाळतात, कारण त्यांना असे वाटते की बाहेरचे मोमोज खाल्ल्याने पोच खराब होते. पण तुम्ही घरीच मोमोज बनवू शकता. घरी बनवलेले मोमो हे आरोग्यदायी तर असतातच पण ते बनवण्यासाठी तुम्ही हेल्दी घटक देखील वापरू शकता.  


पण घरी मोमोज बनवताना पीठ नीट मळले जात नाही अशा अनेक समस्या निर्माण होतात. काही वेळा मोमोजचे स्टफिंग नीट केले जात नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊया मोमोजसाठी पीठ मळताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.   

मैद्यात गव्हाचे पीठ

परफेक्ट मोमोज बनवण्यासाठी मैद्यामध्ये गव्हाचे पीठ मिक्स करणे गरजेचे आहे. कारण फक्त मैदा वापरल्यास मोमोज काही वेळाने कडक होतात. त्यामुळे मोमोसाठी पीठ मळताना थोडे गव्हाचे पीठ मिक्स करावे. गव्हाचे पीठ जास्त वापरू नका, कारण जास्त मैदा वापरल्यास मोमोजची चव खराब होईल.


व्हिनेगरचा वापर

मोमोज् चे पीठ मऊ आणि मलईदार बनवण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. पीठ मऊ होण्यासाठी आंबटपणा आवश्यक असतो. जर तुम्हाला व्हिनेगर वापरायचे नसेल तर तुम्ही दही किंवा लिंबाचा रस देखील वापरू शकता. फक्त प्रमाण बरोबर घ्यावे अन्यथा मोमोज् आंबट होतील.  

गरम पाण्याचा वापर

जर तुम्हाला घरी परफेक्ट मोमोज बनवायचे असतील तर पीठ मळताना गरम पाणी वापरावे. यामुळे मळलेले पीठ खूप मऊ राहील आणि बनवलेले मोमोज खूप मऊ राहतील.

यासाठी पिठात थोडे थोडे कोमट पाणी मिक्स करावे. यासोबतच पीठ हलक्या हाताने मळून घ्यावे लागेल. असे केल्याने पीठ एकदम मऊसर होईल आणि जर तुम्हाला मोमोज तळायचे असतील तर तेही सहज करता येईल. 

पीठ कसे मळावे

  • यासाठी एक कप मैद्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चिमूट बेकिंग सोडा मिक्स करावा.

  • पिठात बेकिंग सोडा टाकल्यामुळे मोमोज वाफवल्यानंतर ते कडक होत नाहीत तर तोंडात टाकताच मऊ होते आणि वितळते.

  • मोमोजसाठी पीठ पुरीच्या पिठापेक्षा मऊ आणि रोटीच्या पिठापेक्षा घट्ट मळून घ्यावे लागते. कोमट पाण्याने पीठ मळावे.

  • पीठ मळून झाल्यावर काही वेळ कपड्याने झाकून ठेवावे.यामुळे मोमोज बनवणे सोपे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT