Cooking Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Hacks: भात करपलाय? टेंशन घेऊ नका, भाताचा जळकट वास झटक्यात घालवेल 'या' ट्रिक

संपुर्ण भारतात जेवणात भात मोठ्या आवडीने खाल्ला जातो.

Puja Bonkile

Cooking Hacks: आशियायी खंडात अनेक लोक भात आवडीने खातात. दिवसभरात एकदा तरी जेवणात भात हवाच असतो. कारण काही लोकांनाभात खाल्ल्याशिवाय जेवण पुर्ण झाले असे वाटत नाहीत. तर अनेक लोकांसाठी भात आणि भाताचे अनेक प्रकार म्हणजेच संपुर्ण जेवण असू शकते. भात शिजवणे खुप सोपे आहे. पण अनेकवेळा भात शिजवतांना करपतो आणि त्याचा करपट वास पुर्ण भाताला येतो. अशावेळी भात फेकुन न देता तुम्ही या ट्रिक्स वापरून भाताचे सेवन करू शकता.

भात बनवताना करपला तर काय करावे?

भात बनवताना करपला असेल तर तो फेकून देण्याची गरज नाही. पुढिल सोप्या ट्रिक फॉलो करून तुम्ही कोणत्याही वासाशिवाय चांगल्या भाताचा आनंद घेऊ शकता.

कांद्याचा वापर

जेव्हा भात शिजवता तेव्हा कधी-कधी करपतो आणि संपूर्ण भाताला त्याचा वास येऊ लागतो. अशावेळी भात फेकून न देता भाताचा करपलेला वास दूर करण्यासाठी सर्वात पहिले कांद्याचे चार तुकडे करावे. कांदा कापण्यापूर्वी सोलू नका. आता हे चार कांद्याचे तुकडे भातामध्ये मिक्स करावे आणि भाताच्या भांड्यामध्ये चार वेगवेगळ्या भागात ठेवावे. नंतर झाकण बंद करा आणि दहा मिनिटे ठेवावे. 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की कांद्याने भाताचा सर्व करपलेला वास शोषून घेतलेला असेल. भाताचा चांगला भाग खा आणि तुमच्या भाताचा फक्त खालचा करपलेला भाग काढून टाकावा.

तुपाचा वापर

जर भात करपला असेल तर तुम्ही तुपाचा वापर जळकट वास कमी करण्यासाठी करू शकता. यासाठी भाताचा चांगला भाग काढून घ्यावा. नंतर एका कढईत तुप गरम करून त्यात जिरं टाकावे आणि भात मिक्स करावा.

ब्रेडचा वापर

भाताचा करपलेला वास लगेच दूर करण्यासाठी भातामध्ये ब्रेडचा तुकडा ठेवावा. यामुळे भातामधील वास कमी होण्यास मदत मिळते.

लसणाचा वापर

करपलेल्या भातातील जळकट वास कमी करण्यासाठी तुम्ही लसणाच्या कळीचा वापर करू शकता. यासाठी एका कढईत तेल गरम करावे नंतर त्यात लसणाचे तुकडे टाकावे. नंतर हे तेल भातावर टाकावे आणि 10 मिनिटं झाकुन ठेवावं. यामुळे जळकट वास निघुण जाईल.

बटाट्याचा वापर

बटाट्याचा वापर करून तुम्ही करपलेल्या भातामधील जळकट वास कमी करू शकता. यासाठी भातावर बटाट्याचे काप ठेवावे. यानंतर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवावे. बटाटा जळकट वास शोषून घेतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT