Tea Lovers  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea Lovers ची काळजी वाढवणारी बातमी! संध्याकाळचा चहा पिणं ठरू शकतं हानिकारक?

भारतात मोठ्या प्रमाणात चहाप्रेमीं आहेत.

दैनिक गोमन्तक

भारतातील लोकांना चहा खूप आवडतो. विशेषतः दुधाचा चहा अधिक प्रिय आहे.  शहरातील गल्लीबोळापासून गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत तुम्हाला चहाची दुकाने सापडतील. लोकांना फक्त सकाळी चहा प्यायला आवडत नाही, तर ते दिवसातून अनेक वेळा चहा घेतात. सकाळ-संध्याकाळ चहाचा आस्वाद लोक जास्त घेतात, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. पण अधिक प्रमाणात चहा घेणे धोकादायक ठरु शकते.

असे म्हटले जाते की संध्याकाळी चहा (Tea) प्यायल्याने शरीरावर काही हानिकारक परिणाम होतात. सुमारे 64 टक्के भारतीय लोक रोज चहा पिण्यास प्राधान्य देतात, त्यापैकी 30 टक्के लोक संध्याकाळी चहा पितात. चला जाणून घेऊया संध्याकाळी चहा पिण्याचे काय तोटे आहेत.

  • संध्याकाळी चहा पिण्याचे तोटे

वैद्यकशास्त्रानुसार चांगली झोप, चांगले यकृत, डिटॉक्स आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी झोपण्याच्या 10 तास आधी कॅफिनचे सेवन टाळावे. चहामध्ये कॅफिन असते, जे हानी पोहोचवू शकते. आहारतज्ञांच्या मते चहा पिणे वाईट नाही पण भारतातील (India) लोक दुधासोबत चहा पितात, त्यामुळे चहामध्ये असलेल्या अनेक आवश्यक घटकांची शक्ती कमी होते. 

संध्याकाळी कोणी चहा प्यावे

1. नाईट शिफ्टला काम करणारे लोक.

2. ज्या लोकांना गॅस आणि ऍसिडिटी होत नाही.

3. चांगली पचन प्रक्रिया असलेले लोक.

4. ज्या लोकांना चांगली झोप येते.

5. जे दररोज वेळेवर जेवण घेतात.

6. जे लोक दिवसातून एकदाच चहा पितात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT