Compact Powder: हिवाळ्यात त्वचा कोरडी राहते. त्यामुळे जेव्हाही आपण कोणतेही प्रोडक्ट वापरतो तेव्हा त्यामुळे त्वचा खराब होते. हंगामानुसार त्वचा आणि मेकअप प्रोडक्ट खरेदी करणे महत्वाचे आहे. कॉम्पॅक्ट पावडर खरेदी करताना तुम्हाला हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. परफेक्ट कॉम्पॅक्ट पावडर खरेदी करतांना कोणती काळजी घ्याल.
ऑयली स्किन
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही मॅट फिनिश कॉम्पॅक्ट खरेदी करू शकता. यामुळे त्वचेला मॅट फिनिश मिळते आणि मेकअप जास्त काळ टिकतो. बाजारात तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. जे तुम्ही मेकअप करताना लावू शकता.
ड्राय स्किन
जर तुम्ही कोरड्या त्वचेसाठी कॉम्पॅक्ट पावडर शोधत असाल, तर तुम्ही क्रीम आधारित पावडर खरेदी करू शकता . यामुळे चेहऱ्याला चांगला कव्हरेज मिळतो आणि मेकअपही बराच काळ टिकतो. मेकअप करताना तुम्ही ते लावू शकता.
नॉर्मल स्किन
जर तुमची त्वचा सामान्य असेल तर तुम्ही त्वचेवर कोणत्याही प्रकारचे पावडर लावू शकता. कारण ते पावडर आणि क्रीम आधारित कॉम्पॅक्ट दोन्ही शोषून घेईल. त्यामुळे तुम्ही ते तुमच्या मेकअप किटमध्ये ठेऊ शकता. यामुळे तुमचा मेकअप अधिक चांगला दिसेल.
या गोष्टी लक्षात ठेवा
जेव्हा तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर खरेदी करता तेव्हा तुमच्या त्वचेचा टोननुसार खरेदी करावा.
कॉम्पॅक्ट पावडरची एक्सपायरी डेट तपासल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर खरेदी करावे.
त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच त्याचा वापर करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.