Winter care tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

हिवाळ्यात 'ही' लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी साधा संपर्क

हिवाळा जसजसा वाढत जातो तसतसे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढत जातो.

दैनिक गोमन्तक

हिवाळा लवकरच सुरू होणार आहे. सप्टेंबर संपल्यानंतर अनेकजण आल्याचा चहा आणि कॉफीचा आस्वाद घेतांना दिसतात. गार वारा जेवढा मनाला शांती देतो, तेवढाच तो अनेक प्रकारचे आजारही घेऊन येतो. हिवाळ्यात (Winter) तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्याची (Health) काळजी घेणे आवश्यक आहे.

* थंड ताप

हिवाळ्याची चाहूल लागताच अनेकांना सर्दी-तापाचा (Cough) त्रास सुरू होतो. बदलत्या हवामानामुळे किंवा संसर्गामुळे लहान मुले आणि वृद्धांना सर्दी आणि तापाचा येऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या समस्येने ग्रासलेल्या लोकांना डोकेदुखी, अंगदुखी, खोकला यासारख्या समस्या होतात. 

* सांधे दुखी

हिवाळ्यात तुम्हाला सांधेदुखीचा त्रासही होऊ शकतो. विशेषत: ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे, त्यांची समस्या या ऋतूमध्ये खूप वाढते. तुम्हालाही संधिवात असेल तर स्वतःची विशेष काळजी घ्या. 

* टॉन्सिल्स

थंडीमध्ये लोकांना अनेकदा टॉन्सिल्सचा त्रासही होतो. घशाच्या मागील बाजूस दोन अंडाकृती आकाराच्या टिश्यू पॅडच्या सूजमुळे टॉन्सिल होतात. या समस्येमुळे घशात जळजळ आणि वेदना होतात. तसेच खाण्यापिण्यातही (Diet) त्रास होतो. 

* ब्राँकायटिस

सर्दी वाढत असताना लहान मुलांना फुफ्फुसाचा संसर्ग (Virus) होऊ शकतो. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. या समस्येमुळे, फुफ्फुसातील सर्वात लहान वायुमार्गांमध्ये श्लेष्मा तयार होऊ लागतो. त्यामुळे मुलांना खूप त्रास होऊ लागतो. 

* कानाचा संसर्ग

थंडी वाढली की कानाच्या समस्या निर्माण होतात. या स्थितीत कानाच्या (Ear) आत तीव्र वेदना होतात. यासोबतच खाज सुटण्याची आणि बंद होण्याचीही शक्यता असते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT