Coffee Worst Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Coffee Worst Effects: 'हे' 6 आजार असलेल्या लोकांनी कॉफी पिणे करावे बंद

अनेक लोकांना कॉफी प्यायला खुप आवडते. पण पुढील काही आजार असल्यास कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Puja Bonkile

Coffee Worst Effects: अनेकां लाकंची दिवसाची सुरुवात कॉफीने होते. तसेच अनेक लोक काम करताना फ्रेश राहण्यासाठी देखील कॉफी पितात.पण अति प्रमाणात कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कॉफी पिणे वाईट आहे असे नाही. पण त्याचे सेवन प्रमाणात करावे.

1. पोटाचे विकार
IBS हा पोटाचा एक जटिल विकार आहे. या आजाराने ग्रस्त लोक अनेकदा अतिसार आणि बद्धकोष्ठता या समस्येने त्रस्त असतात. तसेच कॉफी प्यायल्यानंतर IBS वाढते. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना कॉफीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः दूध असलेली कॉफी त्यांच्यासाठी जवळजवळ विषासारखी असते.

2. काचबिंदू
काचबिंदू हा डोळ्यांचा गंभीर आजार आहे. या आजाराच्या सापळ्यात अडकल्यावर दृष्टी हळूहळू क्षीण होऊ लागते. तज्ज्ञांच्या मते या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी कॉफी पिणे टाळावे. कारण अभ्यासातून असे दिसून आले आहे की जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्याने काचबिंदूची समस्या वेगाने विकसित होऊ शकते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी या आजाराने त्रस्त असलेल्यांनी कॉफीपासून दूर राहावे.

3. मूत्राशयाची समस्या
कॉफीमध्ये मूत्रवर्धक घटक असतात. त्यामुळे कॉफी प्यायल्याने लघवीचे प्रमाण वाढते. आणि याच कारणामुळे मूत्राशयाच्या आजाराने त्रस्त लोकांना कॉफी प्यायल्यानंतर रिकामे वाटू लागते. त्यांना वारंवार लघवी करावी लागते. मूत्र गळतीचा धोका देखील असतो. त्यामुळे ही समस्या असलेल्या लोकांनी कॉफी पिणे टाळावे.

4. उच्च रक्तदाब आणि हृदयविकार
कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे रक्तदाब आणि हृदय गती तात्पुरती वाढू शकते. यामुळे गंभीर हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच ज्यांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांनी हे कॉफी पिणे टाळावे. 

5. गर्भधारणा
गरोदरपणात कॉफी न पिणे चांगले आहे.  तुम्ही गर्भपातापासून ते मुदतपूर्व प्रसूतीपर्यंतच्या अनेक समस्यांना बळी पडू शकता. विशेषतः जर तुम्हाला हे पेय गरोदरपणात घ्यायचे असेल तर प्रथम एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

6. मायग्रेन
मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी कॉफी पिणे टाळावे. कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. यामुळे खुप वेदना होतात. तसेच मद्यपान केल्याने मायग्रेनची समस्या वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT