Cloves Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cloves Health Benefits: लवंग एक प्रभावी औषध, अनेक आजारांवर रामबाण उपाय

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण लवंग केवळ खोकला कमी करत नाही तर आहेत अनेक फायदे.

दैनिक गोमन्तक

Health Benefits of Cloves: हवामानात बदल झाला की अनेक आजार डोकवर काढतात. हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.

या आजारांपासून दूर राहण्यासाठी अनेक लोक चहा-कॉफीसारख्या गरम पदार्थांचे सेवन करतात. पण खोकला, सर्दी आणि घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लवंगाचा वापर करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का?

सर्व घरांमध्ये आढळणारी लवंग नैसर्गिकरित्या खोकला बरा करण्यास मदत करतो. . तसेच रोगप्रतिकारशक्ती (Immunity) सुधारण्याचे काम करते.

लवंगात युजेनॉल आणि गॅलिक अॅसिड सारखी फिनोलिक संयुगे असतात. जी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतात. जाणून घेऊया लवंग खाण्याचे फायदे कोणते आहेत.

लवंग खाण्याचे फायदे

  • फॅटी लिव्हर असलेल्यांसाठी उपयुक्त

अँटिऑक्सिडंट्सचे मुबलक प्रमाण असल्याने लवंग शरीराच्या अवयवांच्या, विशेषतः यकृताच्या आरोग्यासाठी (Health) एक चांगला पर्याय आहे. लवंगमध्ये हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात. जे मुक्त चयापचय क्रियाकलापांमुळे होणाऱ्या प्रभावांना विरोध करतात. 

  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्ण शरीरात आवश्यक प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की लवंगाच्या वापरामुळे शरीरात इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. 

Cloves
  • प्रतिकारशक्ती बूस्टर

एक लवंग शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवण्याचे काम करते. लवंगात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. म्हणूनच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. त्यांनी लवंगाचे सेवन करावे. 

  • श्वासाची दुर्गंधी दुर करते

लवंगीला एक विशेष सुगंध असतो. म्हणूनच श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही विविध पदार्थांमध्ये लवंगचा वापर करु शकता.

  • खोकल्यापासून आराम

अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध लवंग खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीसाठी फायदेशीर मानली जाते. घसा खवखवण्याच्या समस्या दुर करण्यासाठी तुम्ही लवंग रॉक मिठाने चघळू शकता.

हे घशाची सूज दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. जर तुम्हाला कोरडा खोकला किंवा सतत खोकल्याचा त्रास होत असेल, तर हा घरगुती उपाय करून पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT