Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: स्टीलचे स्टँड स्वच्छ करण्यसाठी फॉलो करा 'या' टिप्स

जर तुम्ही स्वयंपाकघरात भांडी ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची रॅक वापरत असाल, तर काही मिनिटांत त्यावर साचलेला चिकटपण कमी करू शकता.

Puja Bonkile

Cleaning Tips: घरातील किचन स्वच्छ असल्यास अनेक आजार दूर राहतात. भारतीय घरांमध्ये भांडी ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या रॅकचा वापर केला जातो. सहसा भांडी ठेवण्याचे स्टँड भिंतीवर लावलेला असतो. त्यामुळे त्याची रोज स्वच्छता होत नाही.

त्यामुळे हळूहळू त्यावर इतकी घाण साचते की फक्त ओल्या कपड्याने पुसणे पुरेसे नसते. तसेच, स्वयंपाकघरात रॅक असल्यामुळे स्वयंपाक करताना निर्माण होणारा चिकटपणामुळे जास्त खराब होते.

सध्या मॉड्युलर किचनची संकल्पना सुरू झाल्यापासून, त्याची लोकप्रियता कमी झाली आहे. पण तरीही, जर तुमच्या घरात भांडी ठेवण्याचे स्टँड असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी पुढील गोष्टी वापरू शकता.

Vinegar

व्हिनेगर

भांडी ठेवण्याच्या स्टँडवरचा चिकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी 1 चमचे व्हिनेगर आणि 2 चमचे पाणी टाकुन मिश्रण तयार करावे. नंतर ते स्टँडवर लावावे आणि घासावे. नंतर कोमट पाण्याने स्टँड पुसून कोरड्या कापड्याने स्वच्छ करावे.

Baking Soda

बेकिंग सोडा

घरातील भांडी ठेवण्याचे स्टँड स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करावी. नंतर ते भांडीच्या स्टँडवर ठेवावे आणि २० मिनिटे तसेच राहु द्या. आता डिशवॉशने स्वच्छ करावे आणि शेवटी कोमट पाण्याने स्टँड धुवावे आणि कोरडे करावे.

अशी घ्या काळजी

भांडे ठेवण्याचे स्टेनलेस स्टीलचा स्टँड बराच काळ स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी, ऑलिव्ह ऑइलमध्ये सूती कापड भिजवावे आणि घासून घ्यावे. लक्षात ठेवावे की जास्त तेल वापरू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT