Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: भांड्यावरचा चिकटपणा कमी करण्यासाठी चिंचेचा असा करा वापर

चिंच खाणे आरोग्यासाठा फायदेशीर असते.

Puja Bonkile

Cleaning Tips: चिंच ही एक भारतीय स्वयंपाकघरातील उपयुक्त गोष्टी आहे. चिंच खाल्यावर तुमचा मुड चांगला होतो. चिंच चटणी, कडी, भाजी यासारख्या अनेक पदार्थांमध्ये टाकून सेवन करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का चिंचेच्या मदतीने तुम्ही भांडी स्वच्छ करू शकता.

चिंचेची चव आंबट आणि तुरट असते. तसेच चिंच ही अम्लीय आहे. यामुळे चिंच व्हिनेगर आणि लिंबुसारखे काम करते. चिंचेची साल कठोर असते. यामुळे भाड्यांचा तेलकटपणा आणि घाण काढून टाकण्यासाठी मदत मिळते. चिंचेचा वापर क्लिनिंग एजंट म्हणून केला जातो.

घरातील सिंक

स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. यामुळे सिंकमधील घाण आणि चिकटपणा कमी होतो.यासाठी चिंचला थोडे मीठ लावे आणि घासुन घ्यावे.

घरातील चिमणी

स्वयंपाकघरातील चिमणी नियमितपणे वापरल्यास काजळी आणि तेल जमा होते. ही घाण अनेकदा स्वच्छ करणे कठीण होते. चिंचेमध्ये असलेले अॅसिड घाण आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते.

चांदीची भांडी

चांदीची भांडी स्वच्छ ठेवली नाही तर ती लगेची काळी पडतात. चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंच वापरू शकता. यासाठी चिंच आणि मीठ एकत्र मिक्स करावे आणि चांदीची भांडी घासावी. यामुळे चांदीची भांडी नव्यासारखी चमकतात.

स्टीलची भांडी

स्टीलचे भांडे स्वच्छ करणे सोपे आहे. परंतु जर ते योग्यरित्या केले नाही तर पदार्थांना वास येऊ शकतो. यामुळे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. तुम्ही स्टीलच्या भांड्यांना लगेच चिंच लावून घासु शकता. यामुळे भांड्यांचा दुर्गंध कमी होतो.

तांब्याची भांडी आणि पितळेची भांडी

तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी चिंचेचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. भांड्यांपासून ते मूर्ती आणि सजावटीच्या वस्तूंपर्यंत तुम्ही चिंचेच्या मदतीने स्वच्छ करू शकता. भांड्यांवर थोडे मीठ टाकावे आणि भिजवलेल्या चिंचेच्या भागाने भांडी घासून घ्यावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.

नळावरील गंज

घरातील नळावरचा आलेला गंज कमी करण्यासाठी चिंचेचा वापर करू शकता. यासाठी गंजलेल्या भागावर भिजवलेली चिंच लावावी आणि थोडा वेळ तसेच राहू द्यावे. टार्टेरिकअॅसिड गंज कमी करण्यास मदत करते.नंतर स्क्रबरच्या मदतीने तुम्ही नळ स्वच्छ करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT