Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: घरातील 'या' 5 गोष्टी व्हिनेगरने करू नका स्वच्छ , अन्यथा वस्तु होतील खराब

व्हिनेगरचा वापर स्वच्छतेसाठी देखील केला जातो,पण काही गोष्टींसाठी व्हिनेगरचा वापर टाळावा.

Puja Bonkile

Cleaning Tips: घरातील अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी बाजारात केमिकल प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण नैसर्गिक पर्याय म्हणून व्हिनेगरचा वापर स्वच्छतेसाठी केला जातो. किचनमध्ये स्वच्छतेसाठी व्हिनेगरचा वापर केला जातो. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या व्हिनेगरने स्वच्छ केल्यास खराब होऊ शकतात. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

  • इलेक्ट्रॉनिक्स वस्तु

टिव्हि, मोबाईल आणि लॅपटॉपची स्क्रीन चुकूनही व्हिनेगरने स्वच्छ करू नये. कारण त्यात अँटी-ग्लेअर कोटिंग असते. जे व्हिनेगरमध्ये असलेल्या सौम्य अॅसिडमुळे खराब होऊ शकते. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची स्वच्छता करण्यासाठी नेहमी ग्लास क्लीनर वापरावे.

  • ग्रेनाइट

ग्रेनाइट, संगमरवरी आणि चुनखडीसारखे नैसर्गिक दगड कधीही व्हिनेगरने स्वच्छ करू नका. कारण त्यामध्ये असलेल्या अॅसिडमुळे ते खराब होऊ शकते. यामुळे कधीच नैसर्गिक दगड व्हिनेगरने स्वच्छ करू नये. त्यांची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.

  • लोखंड

व्हिनेगर हे एक स्ट्रॉग लिक्विड आहे. जर तुम्ही व्हिनेगरने लोखंड स्वच्छ करत असाल तर त्याला लवकर गंज लागु शकतो. यामुळे लोखंडाच्या वस्तु चुकूनही व्हिनेगरने स्वच्छ करू नका.

  • लाकडी फर्निचर

तुम्हीही लाकडी फर्निचर व्हिनेगरने स्वच्छ करत असाल तर आजच बंद करा. कारण यामुळे फर्निचरचा रंग खराब होऊ शकतो. यामुळे चुकुनही लाकडी फर्निचर व्हिनेगरने स्वच्छ करू नका. लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी नेहमी स्वच्छ कापडाचा वापर करावा.

रबर गॅस्केट

पाण्याचा वापर न करता व्हिनेगरने वॉशिंग मशीनमधील रबर गॅस्केट स्वच्छ करू नये. कारण असे केल्याने रबर आकुंचन पावते आणि तुटू शकते. यामुळे व्हिनेगर वापरतांना काळजी घ्यावी. चांगल्या आणि महागड्या वस्तु देखील खराब होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT