Christmas Tree  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Christmas Tree: ख्रिसमस ट्री घरात कोणत्या दिशेला ठेऊ नये? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

ख्रिसमस ट्रीशिवाय ख्रिसमस सण अपूर्ण मानला जातो. याचे कारण म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्रीचे मोठे महत्त्व आहे. ख्रिसमस डे ला अनेक लोक आपल्या घरात ख्रिसमस ट्री लावतात. पण ते योग्य जागी ठेवणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Christmas Tree: ख्रिसमस डे ला अवघे काही दिवस उरले आहेत. ख्रिसमसनिमित्त अनेक दुकाने घर सुंदर पद्धतींनी सजलेले जातात. पण ख्रिसमस ट्री शिवाय हा सण अपूर्ण आहे. याचे कारण म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्रीचे मोठे महत्त्व आहे. ख्रिसमस डे च्या अनेक दिवस आधी लोक आपल्या घरात ख्रिसमस ट्री लावतात. हे घरामध्ये खूप शुभ मानले जाते. जर तुम्हीही घरात ख्रिसमस ट्री लावत असाल तर वास्तुत सांगितलेले नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तूंसह त्यातील सजीव वस्तूंची योग्य स्थिती आणि दिशा असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या दिशेने ठेवलेली चांगली गोष्ट देखील अशुभ परिणाम देते. पण योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मकता आणि आनंद येतो. वास्तूनुसार ख्रिसमस ट्री लावण्यासाठी एक निश्चित दिशा असते. योग्य ठिकाणी ठेवल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. 

  • या ठिकाणी ख्रिसमस ट्री लावू नका

वास्तूनुसार काही ठिकाणी ख्रिसमस ट्री ठेवणे खूप अशुभ मानले जाते. या ठिकाणी चुकूनही ख्रिसमस ट्री ठेवू नये. यामध्ये प्रामुख्याने घराच्या मुख्य दरवाजासमोर अस्वच्छ ठिकाणी, टॉयलेटसमोर किंवा बाथरूमच्या आजूबाजूचा समावेश होतो. या ठिकाणी ख्रिसमस ट्री लावल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते. 

  • शुभ दिशा कोणती

वास्तुशास्त्रानुसार ख्रिसमस ट्री घराच्या उत्तर दिशेला ठेवणे खूप शुभ असते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. जर तुम्ही झाडाला उत्तर दिशेला ठेवू शकत नसाल तर तुम्ही ते उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व किंवा आग्नेय दिशेला लावू शकता. यातून शुभ परिणाम प्राप्त होतात. यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न होते, परंतु विरुद्ध दिशेला ठेवल्यास वास्तू दोषांवर परिणाम होतो. 

  • कशी कराल सजावट


ख्रिसमस ट्री रिबन आणि रंगीबेरंगी लाइटिंगने सजवू शकतात. त्यावर विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू आणि लाइंट्स लावण्यात आले आहेत. वास्तूनुसार ख्रिसमस ट्रीवर लाल आणि पिवळ्या रंगाचे लाइट्स लावावेत. हे शुभ मानले जाते. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT