Christmas Special Cookies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Christmas Special Cookies: ख्रिसमसला 'या' 5 स्वादिष्ट कुकीजचा घ्या आस्वाद, नोट करा रेसिपी

या कुकीज बनवायला अगदी सोप्या असून आरोग्यदायी आहेत.

Puja Bonkile

Christmas Special Cookies: जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी कुटूंब आणि मित्रांसह विविध पदार्थांचा आनंद घेतला जातो आणि गिफ्ट दिले जातात. तुम्ही या खास दिवसानिमित्त पाच प्रकारचे कुकीज बनवू शकता. हे कुकीज बनवायला अगदी सोपे असून आरोग्यदायी आहेत. लहान मुलांना देखील खुप आवडेल. चला तर मग जाणून घेऊया या कुकीज कोणत्या आहेत.

ओट्स कुकीज

ओट्स कुकीज बनवण्यासाठी सर्वात पहिले सर्व ओव्हन 350°F वर गरम करा.

नंतर एका भांड्यात बटर, ब्राऊन शुगर, मध आणि पाणी घालून चांगले मिक्स करा.

यानंतर या मिश्रणात मैदा, मीठ, बेकिंग सोडा आणि ओट्स घालून चांगले मिक्स करा.

नंतर याची पोळी बनवावी.

नंतर कुकी कटरने कुकीज कापून घ्या.

या कुकीज कुकी शीटवर ठेवा आणि सुमारे 15 मिनिटे ओव्हनमध्ये बेक करा.

तुमच्या कुकीज तयार आहेत.

मनुका कुकीज

सर्वात पहिले बिया नसलेले काळे मनुके 10 मिनिटे पाण्यात भिजवावे आणि नंतर गाळून बाजूला ठेवा.

आता एका भांड्यात मैदा, साखर, बेकिंग पावडर, मीठ, लोणी, राखून ठेवलेले मनुके आणि थोडे दूध घालून चांगले मिक्स करावे.

यानंतर हे पीठ लाटून घ्या आणि कुकी कटरने कुकीज काढा आणि बाजूला ठेवा.

शेवटी, या कुकीज एका बेकिंग ट्रेवर ठेवा, ब्रशने त्यावर दूध लावा आणि बेक करा.

नारळ कुकीज

सर्वात पहिले लोणी गरम करून त्यात साखर आणि दूध घालून थोडा वेळ शिजवून घ्यावे.

आता या मिश्रणात मैदा, सुके खोबरे, कस्टर्ड पावडर आणि तुमचा आवडता खाद्य रंग टाका आणि नीट मिक्स करून शिजवा.

यानंतर या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि ते बेकिंग ट्रेवर ठेवा.

नंतर ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत बेक करा.

तुमच्या नारळ कुकीज तयार आहेत.

आलं कुकीज

सर्वात पहिले बटर घ्या, नंतर त्यात साखर, मध आणि किसलेले आलं घालून मिक्स करा.

नंतर मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून गाळून घ्या.

नंतर या पीठात बटरचे मिश्रण घालून झाकून ठेवा आणि रात्रभर राहू द्या.

यानंतर, या मिश्रणाचे गोळे घ्या, ते रोल करा आणि नंतर कुकीजला वेगवेगळ्या आकारात कापून घ्या.

शेवटी, या कुकीज गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करा.

शेंगदाणा कुकीज

शेंगदाणा कुकीज बनवण्यासाठी एका भांड्यात तूप गरम करून त्यात पिठीसाखर घालून मिक्स करा.

नंतर या मिश्रणात मैदा, आधीच भाजलेले शेंगदाणे पावडर आणि 1 चमचे बेकिंग सोडा घालून चांगले मिसळा.

यानंतर या मिश्रणातून तुमच्या आवडीच्या आकारात कुकीज कापून घ्या. शेवटी एका ट्रेमध्ये थोडं तूप लावून त्यात कुकीज ठेवा, मग ओव्हनमध्ये बेक करा. हे कुकुज् मुलांसाठी आरोग्यदायी असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

SCROLL FOR NEXT