Chocolate Day Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chocolate Day Special : 'चॉकोलेट डे'ला घरीच बनवा खास प्रकारचे चॉकलेट आईस्क्रीम; नात्यात वाढवा गोडवा

जर तुम्हालाही या चॉकलेट डेवर तुमच्या जोडीदारासाठी काही खास करायचं असेल तर चॉकलेट आईस्क्रीम बनउ शकता.

दैनिक गोमन्तक

Chocolate Day 2023: दरवर्षी 7 ते 14 फेब्रुवारी हे दिवस व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. प्रेमीयुगलांसाठी हा दिवस खास असतो. आज व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे. या दिवशी कपल्स आपल्या जोडीदाराला आवडते चॉकलेट देऊन आपले मन व्यक्त करतात. 

एकमेकांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचे काम करतात. तक्रारी दूर करून जवळीक वाढवतात. चॉकलेट (Chocolate) देऊन आनंद वाटून घेतात. या खास दिवशी चॉकलेट आईस्क्रीम बनउ शकता. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट आईस्क्रीम कसे बनवायचे आणि त्यात कोणते पदार्थ वापरले जातात.

चॉकलेट आईस्किम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • डेअरी क्रीम किंवा व्हीप्ड क्रीम

  • आटवलेले दुध

  • कोको पावडर

  • भाजलेले बदाम

  • चॉकलेट चिप्स

  • दालचिनी पूड

ice cream

चॉकलेट आईस्किम बनवण्याची कृती

  • कोणत्याही मिक्सिंग बाऊलमध्ये क्रीम ठेवा आणि 2 ते 3 मिनिटे चांगले फेटून घ्या.

  • क्रीम व्यवस्थित बसवा. क्रीम बीट करण्यासाठी बीटर वापरणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा जोपर्यंत क्रीम फ्लफी होत नाही तोपर्यंत आइस्क्रीम चांगले होणार नाही.

  • दुसऱ्या स्वच्छ बाउलमध्ये तुम्हाला कोको पावडर चाळायची आहे. त्यात दालचिनी पावडर देखील घाला

  • दोन चमचे व्हीप्ड क्रीम घाला आणि चांगले मिसळा.

  • शेवटी या मिश्रणात सर्व क्रीम टाका आणि चांगले मिक्स करा.

  • तुम्ही त्यावर ड्राय फ्रूट्स टाकू शकता.

  • जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या मिश्रणात ओरियो बिस्किटे देखील ठेवू शकता.

  • हे मिश्रण सुमारे 3 तास ​​फ्रीजमध्ये ठेवा.

  • 3 तासांनंतर तुमचे चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे, त्यावर चोको चिप्स टाकून सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT