Chimney Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chimney Cleaning Tips: किचनची चिमणी अस्वच्छ झाल्यास 'या' टिप्सच्या मदतीने करा स्वच्छ

किचनची चमणी अनेकदा चिकट होते. ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Chimney Cleaning Tips: आजकाल प्रत्येक किचनमध्ये चिमणी बसवलेली असते. यामुळे किचनमधील गरम हवा बाहेर फेकली जाते. पण चिमणीची स्वच्छता करणे देखील गरजेचे असते. यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करावा हे जाणून घेऊया.

कसे कराल स्वच्छ

व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि डिशवॉशिंग डिटर्जंट यांसारख्या काही घरगुती गोष्टींच्या मदतीने तुम्ही किचन चिमणीचे फिल्टर आणि ट्रॅप स्वच्छ करू शकता. यामुळे चिमणीमधील चिकटपणा कमी होतो.

चिमणीचा ग्रीस कसा स्वच्छ करावा

चिमणीवरील ग्रीस स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टची मदत घेऊ शकता. यासाठी टूथपेस्ट पाण्यात मिक्स करावे आणि चिमणी स्वच्छ करावी.

गरम पाण्याने स्वच्छ करा

तुम्ही चिमणी गरम करण्यासाठी गरम पाण्याचा देखील वापर करू शकता. यामुळे चिमणीवरचा चिकटपणा कमी होऊ शकतो. लतक्षात ठेवा की गरम पाण्याचा अतिवापर करू नका.

या गोष्टी टाळा

किचन चिमणी स्वच्छ करताना धारदार वस्तू वापरू नका. यामुळे तुमच्या चिमणीवर डाग पडतील आणि ते खराबही होऊ शकते.

चिमणी स्वच्छ करण्यासाठी कोणताही ब्रश किंवा कापड वापरू नका.

चिमणी स्वच्छ करण्यासाठी योग्य ब्रश, रॉड आणि व्हॅक्यूम प्रोडक्ट वापरावे.

लक्षात ठेवा की किचन चिमणीच्या आकारानुसार चिमणीचे सामान खरेदी करावे.

या गोष्टी ठेवा लक्षात

चिमणी स्वच्छ करण्यासाठी पहिले शेगडी काढली पाहिजे. धूळ साफ करण्यासाठी घरात पडलेल्या ब्रशने स्वच्छ करा. चिमणी थंड झाल्यावरच स्वच्छ करावी. अन्यथा तुम्हाला इजा होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT