lunar eclipse| Chandra Grahan 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणाशी संबंधित महत्त्वाच्या 'या' 10 गोष्टी माहितीयं?

lunar eclipse 2022: वर्षाचे पहिले चंद्रग्रहण 16 मे रोजी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणानंतर आता या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 16 मे रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण अशुभ मानले जाते. या काळात अनेक शुभ कार्य करणे टाळतात. या दिवशी मंदिराचे दरवाजेही बंद असतात. चंद्रग्रहणाचा (Lunar Eclipse) प्रभाव सर्व 12 राशींवर दिसणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. (Chandra Grahan 2022 News)

* 16 मे रोजी होणाऱ्या ग्रहणाला ब्लड मून का म्हटले जात आहे

16 मे रोजी चंद्रग्रहण दिसार आहे. चंद्र थोडा लाल रंगात दिसतो म्हणून त्याला ब्लड मून म्हणतात. वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण ही एक महत्त्वाची घटना आहे. चंद्रग्रहणात, जेव्हा चंद्र पूर्ण ग्रहणात असतो, तेव्हा लाल चंद्र दिसतो.

* चंद्रग्रहण कोणत्या राशीत होईल

या वर्षातील चंद्र ग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव वृषभ राशीवर असेल.

* चंद्रग्रहणाची वेळ

हिंदू कॅलेंडरनुसार, सोमवार 16 मे 2022 रोजी चंद्रग्रहण सकाळी 08.59 ते 10.23 पर्यंत असेल.

* चंद्रग्रहण पूर्ण असेल

हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असेल.

* बुद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

* सुतक काळ

16 मे रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणात सुतक काळ नसेल. भारतात हे ग्रहण दिसणार नाही.

* भारतात कुठे दिसणार

वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.

* परदेशात कुठे दिसेल

16 मे रोजी होणारे चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे.

* 2022 मध्ये किती चंद्रग्रहण होतील

2022 मध्ये दोन चंद्रग्रहण होतील. या वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबरला होणार आहे.

* चंद्रग्रहण कसे होते

चंद्रग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडू लागते तेव्हा या स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT