Chanakya Niti: भारतच नाही तर जगातील पहिले अर्थतज्ज्ञ, राजकीय तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ मानले जात असलेल्या चाणक्य तथा कौटिल्य यांनी विविध विषयांमध्ये मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात सांगितलेल्या नियमांची अंमलबजावणी करून आपण आपले जीवन अधिक सुखकर बनवू शकतो. चाणक्य यांनी कोणते पुरूष प्रेमात, विवाहात नेहमी यशस्वी ठऱतात, याविषयीदेखील सांगून ठेवले आहे.
चाणक्यनीतीमध्ये सर्वात छोट्या घटकांपासून ते देश-विदेशात कुटूंब, नातेसंबंध, धोरण याबाबतचे वर्णन केले आहे. ही नीती प्रत्येक मानवाच्या यशस्वी जीवनासाठी महत्वाची आहे. प्रेमात, विवाहात कधीही अपयश न येणारे पुरूष कसे असतात, याविषयी चाणक्यांनी काय सांगून ठेवले आहे पाहुया...
पत्नीला सन्मान देणारे
चाणक्य म्हणतात की, जे पुरूष महिलांना समानतेच्या नजरेने पाहतात, त्यांना सन्मान देतात आणि त्यांचे महत्व जाणतात ते कधीही कुठल्याही नात्यांमध्ये अपयशी ठरत नाहीत.
परस्त्रीविषयी आकर्षण नसणे...
चाणक्यांच्या मते, जर एखादा पुरूष आपली प्रेयसी किंवा पत्नीव्यतिरिक्त इतर कुठल्याही महिलेकडे आकर्षिक होत नसेल तर तो आयुष्यभर त्याच्या प्रेमजीवनात यशस्वी होतो. पुरूषाचा हा गुण नात्यामध्ये विश्वास निर्माण करतो.
पार्टनरची सुरक्षितता
स्वतःच्या पार्टनरच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारे पुरूष महिलांना आवडतात. कुठल्याही परिस्थितीत तो तिच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असेल, अशा व्यक्तीसोबत ती महिला निर्धास्त असते. अशा पुरूषावर प्रेयसीला किंवा त्याच्या पत्नीला विश्वास असतो. अशा नात्यामध्ये कधीही कडवटपणा येत नाही. प्रत्येक मुलगी, महिला तिच्या पतीमध्ये आपल्या वडिलांना शोधत असते. पार्टनरबाबत जेव्हा ही जाणीव मुलींना होते, तेव्हा हे नाते कायमस्वरूपी टिकून राहते, असे चाणक्य म्हणतात.
प्रेमिका, पत्नीचे समाधान
चाणक्य म्हणतात की, प्रेमाच्या नात्यामध्ये प्रेमिका किंवा पत्नीचे समाधान महत्वाचे असते. जो प्रेमी भौतिक सुखासोबत शारिरीक सुख देण्यात सक्षम असतो, असे नातेसंबंध असलेल्या मुली/महिला नेहमी आनंदी राहतातअसे नातेसंबंध दीर्घकाळ टिकून राहतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.