Causes Of Divorce Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Causes Of Divorce: वाढत्या घटस्फोटामागे आहेत 'ही' 5 कारणे

काही छोट्या कारणांमुळे देखील सध्या घटस्फोटाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

Puja Bonkile

Causes Of Divorce: घटस्फोटाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वर्षानुवर्षे अनेक जोडपी प्रेमाशिवाय बळजबरीने एकमेकांसोबत राहत आहेत. कमी शिक्षित असल्यामुळे महिला याला बळी पडतात.

पण आता परिस्थिती बदलत आहे. आता कोणीही म्हणजेच मग तो पुरुष असो किंवा स्त्री, अशा विवाहात राहण्यास भाग पाडले जात नाही, ज्यामध्ये तो किंवा ती आनंदी नाही.

पण कोणत्याही जोडप्यासाठी घटस्फोट घेणे सोपे नसते. त्यामुळे घटस्फोट कोणत्या कारणांमुळे हे जाणून घेऊया.

  • प्रेम कमी होणे

लग्नानंतर प्रेमविवाह करणाऱ्या अशा लोकांमध्येही प्रेम कमी होते. पती-पत्नीच्या नात्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे लोक एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत, हेच पुढे नात्यातील दुरावा वाढण्याचे कारण बनते. याशिवाय, असे देखील दिसून येते की बरेच लोक आपल्या जोडीदाराला गृहीत धरू लागतात, जे नातेसंबंधातून परस्पर प्रेम आणि आदर कमी होण्याचे मुख्य कारण आहे.

  • लैंगिक सुखाचा अभाव

सेक्स ही यशस्वी वैवाहिक जीवनाचे गुपित आहे असे मानतात. जर जोडीदाराला लैंगिक आनंद देता आला नाही तर विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोटाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच लग्नाआधी आपल्या आवडी निवडी आणि मर्यादांबद्दल एकमेकांशी बोलणे आवश्यक आहे.

  • अवैध संबंध

अनेकदा विवाहित लोक त्यांच्या शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करून इतर लोकांशी अवैध संबंध निर्माण करतात. या गोष्टीमुळे अनेकांची लग्ने तुटत असतानाच लोकांचा लग्नावरील विश्वासही उडत चालला आहे. अवैध संबंध हे घटस्फोटाचे एक प्रमुख कारण असू शकते.

  • भावना दुखावणे

वैवाहिक जीवनात बहुतांश अत्याचार हे भाविनक असतात. आजही अनेक लोक फक्त मारहानीला अत्याचार मानतात. पण या अत्याचाराला सर्वाधिक बळी महिलाच पडतात. यामुळे घटस्फोट जास्त होतात. यामुळे असे न करता एकमेकांच्या भावना समजून घ्या.यामुळे नात टिकून राहू शकते.

  • आदर न करणे

कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे गरजेचे आहे. एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी स्वीकारल्या पाहिजे. यामुळे नात टिकुन राहते. अन्यथा नात तुटायला वेळ लागत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT