Sleeping Problems Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कितीही प्रयत्न करून येत नाही झोप? तज्ञांनी सांगितलेल्या 'या' टिप्स येतील कामी; जाणून घ्या

अनेक लोकांना अंथरूणावर पडल्यावर देखील पटकन झोप येत नाही.

Puja Bonkile

अनेक लोकांना अंथरूणावर पडल्यावर देखील पटकन झोप येत नाही. डोक्यात अनेक विचार येत असल्याने अनेकांना शांत झोप लागत नाही. यासाठी काही लोक विविध प्रयत्न करतात पण काही रिझल्ट दिसत नाही. पुरेशी झोप न घेतल्याने मानसिक आणि शारिरिक आजार निर्णाम होऊ शकतात. यामुळे तज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्यास तुम्हाला रात्री शांत झोप येऊ शकते.

1) माइंडफुलनेस मेडिटेशन

शांत झोपेसाठी माइंडफुलनेस मेडिटेशन करणे फायदेशीर ठरू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे झोपेची समस्या दूर होते. तसेच तणाव आणि नकारात्मक विचार दूर ठेवते.

माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे काय?

व्हेरीवेल माइंडच्या मते माइंडफुलनेस मेडिटेसन ही एक मानसिक प्रशिक्षण सराव आहे. यामध्ये नकारात्मक विचार कमी करून तुमचे मन आणि शरीर शांत करते. माइंडफुलनेस हा एक ध्यानाचा प्रकार आहे. यामुळे तुमची एकाग्रता देखील वाढते.

तसेच, तज्ञांच्या मते शांत झोप येण्यासाठी झोपण्याची एक योग्य जागा निश्चित असावी, योग्य वातावरण असणे देखील गरजेचे असते.

2) पायांना उबदार ठेवावे

शांत झोपेसाठी तुम्ही पायात सॉक्स घालू शकता. यामुळे पाय उबदार राहतात. तसेच झोप येण्यास मदत होऊ शकते. 2018 मध्ये केलेल्या अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की पाय उबदार ठेवल्याने लवकर आणि शांत झोपे येते. यासाठी तुम्ही पायात सॉक्स घालू शकता किंवा हीटींग पॅडचा वापर करू शकता.

3) हेड मसाज

लकवर झोप येण्यासाठी हेड मसाज करणे हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. हलक्या हाताने हेड मसाज केल्याने लवकर झोप येण्यास मदत होते. तर दुसरे म्हणजे पारंपारिक चीनी पद्धतीनुसार अॅनामियन एक्यूपॉइंट चा वापर करून तुम्हाला लवकर झोप येऊ शकते. यासाठी कानाच्या मागे हलक्या हाताने मसाज केल्यास लवकर झोपे येते.

4) मिठी मारणे

कधी कधी झोपताना एखाद्या वस्तुला किंवा व्यक्तीला मिठी मारल्याने लवकर आणि शांत झोप येण्यास मदत होते. मिठी मारल्याने तुमच्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टिसोलची पातळी कमी होऊ शकते.झोपताना तुम्ही उशी,सॉफ्ट टॉयला मिठी मारून झोपु शकता.

5) एएसएमआर व्हिडिओ

ऑटोनॉमस सेन्सरी मेरिडियन रिस्पॉन्स (ASMR) म्हणजे तुमच्या इंद्रेयांना एक संवेदना निर्माण करणे होय. सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहून लवकर झोप येण्यास मदत होते. या व्हिडिओमध्ये खाण्याचा आवाज, प्लॅस्टिकची बॅग फोडण्याचा आवाज यासारखे अॅक्टिव्हिटी असतात. हा आवाज ऐकल्याने मुड सुधारण्यास आणि ताण कमी करण्यास मदत होते. तुम्ही तणावमुक्त असल्यास लवकर झोपु शकता.

6) इतर गोष्टी

तुम्ही जितका जास्त झोपण्याचा प्रयत्न करता तितकी झोप येत नाही. अशा वेळी अंथरूणावरून उठून बाहेर थोडावेळ चालावे, पुस्तक वाचावे किंवा एखादा चांगला व्हिडिओ पाहल्यास तुम्हाला लवकर झोप येऊ शकते. झोपतांना रूममध्ये मंद लाइट किंवा अंधार करावा यामुळे लवकर झोप येण्यास मदत मिळते.

डेलिओने घेतलेल्या तज्ञांच्या मुलाखतीनुसार, लवकर झोप येण्यासाठी झोपेच्या चार तास आधी कॉफी, मद्यपान आणि धुम्रपानाचे सेवन टाळावे. तसेच टीव्ही पाहणे टाळावे. तसेच तज्ञांच्या मते झोपण्यापुर्वी थोडे वाचन करावे, आरामदायी कपडे घालावे, शांत संगीत ऐकावे यामुळे लवकर झोप येण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT