boy riding goat with helmet viral video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Viral Video : बकरीवर बसून तो ऐटीत शायनिंग मारायला गेला अन्..., तुम्हीही म्हणाल हा पागल झालाय!

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही.

दैनिक गोमन्तक

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. अनेक वेळा असंही घडतं की लोक काही विचित्र गोष्टी करत असतात आणि इतर लोक त्यांचा व्हिडिओ बनवतात आणि तो व्हायरल होतो. बरं, आता आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, तो पाहिल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला हसण्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही. हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे, जो बकरी चालवत आहे.

(boy riding goat with helmet viral video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की रिकाम्या शेतात हेल्मेट घातलेला मुलगा बकरीवर बसला आहे आणि बकरीही मजेने चालत आहे. जसे लोक घोड्यावर बसतात तसे हा मुलगा हेल्मेट घालून बसला आहे. मुलाची स्टाईल पाहता तो घोड्यावर स्वार आहे असे दिसते. याशिवाय, मुलाने बकरीच्या गळ्यात एक कापड पकडून तिच्या दोन्ही टोके आपल्या हातांनी धरली आहेत. पण काही अंतर गेल्यावर तुम्हाला दिसेल की मुलाचा पाय जमिनीवर अडकला आणि तो खाली पडला.

हा व्हिडीओ बघायला खूप मजेशीर आहे आणि लोकांना तो खूप आवडला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ a_k_r_16k नावाच्या पेजद्वारे पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिले - आधी कारचे मेंटेनन्स करा. दुसऱ्याने लिहिले - प्राण्यांना अशा प्रकारे त्रास देणे अत्यंत चुकीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT