Boost your kid's memory with these superfood Dainik Gomantak
लाइफस्टाइल

स्मरणशक्तीत वाढविण्यासाठी लहान मुलांना खाऊ घाला 'हे' Super Food

लहान मुलांच्या शारीरिक (Physical) आणि मानसिक (Mental) विकासाठी त्यांच्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

लहान मुलांच्या जन्मानंतर पहिले ३ वर्ष मेंदूच्या विकासासाठी (Brain development) महत्वाची असतात. पहिल्या काही वर्षात मुले बोलायला, विचार करायला,चालायला तसेच प्रतिक्रिया द्यायला शिकतात. म्हणूनच लहान मुलांच्या (Small child) मेंदूचा विकास होण्यासाठी त्यांना सकस आणि पौष्टिक (Nutritious) आहार देणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया पौष्टिक पदार्थांबद्दल.

* ग्रीक दही

लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी ग्रीक दही लाभदायी आहे. ग्रीक दही मेंदूच्या पेशींचा चांगला विकास करण्यासाठी मदत करते. यामुळे मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.

* हिरव्या पालेभाज्या

लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाठी त्यांच्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. यामुळे मेंदूच्या पेशी निरोगी राहण्यास मदत मिळते. म्हणूनच लहान मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या समावेश करावा. जसे कि टोमॅटो, रताळे, बीन्स, पालक इत्यादीचा समावेश करावा.

* ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 3, बी 6, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त, फॉस्फरस, अँटि-ऑक्सिडंटस असतात. यामुळे आपल्या शरीराची रोकप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. तसेच लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास देखील मदत मिळते. यामुळे लहान मुलांच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करावा.

* अंडी

अंड्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, यासारखे पोषक घटक असतात. तसेच अंडी खाल्याने शरीरातील अशक्तपणा कमी होते. तसेच लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते. यामुळे लहान मुलांना नियमितपणे सकाळी नाश्त्यात अंडी द्यावी.

* ओट्स

एका संशोधनात असे आढळून आले की, ओट्स खाल्ल्याने लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते. यात व्हिटॅमिन ई, जिंक, फायबर, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन आणि अॅंटी- ऑक्सीडेंटस भरपूर प्रमाणात असतात. ओट्सचे सेवन केल्याने मानसिक आणि शारीरिक विकास होण्यास मदत मिळते.

* जांभूळ

जांभूळ हे फळ मान्सूनमध्ये खाल्ले जाणारे फळ आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन सी तसेच पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे लहान मुलांमध्ये स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.

* सुकामेवा

बदाम, काजू, अक्रोड, यासारखे ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन ई, फायबर, अॅंटी- ऑक्सीडेंटस यासारखे पोषक घटक असतात. याचे सेवन केल्याने मेंदूचा विकास होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT