Blouse Style In Winter Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Blouse Style In Winter: हिवाळ्यात साडीसोबत स्वेटर मिक्स अन् मॅच करून करा ब्लाउज स्टाइल, दिसाल अधिक सुंदर

हिवाळ्यात देखील दिसाल स्टायलिश फक्त ट्राय करा पुढील सिंपल टिप्स

Puja Bonkile

Blouse Style In Winter: प्रत्येक मुलीला साडी नेसायला आवडते. यासाठी वेगवेगळ्या डिझाईन्सच्या साड्या वेगळ्या आणि सुंदर दिसण्यासाठी खरेदी केल्या जातात. परंतु हिवाळ्यात असे होत नाही, कारण ते स्टाईल करणे थोडे कठीण होते. कारण थंडीमुळे अधिक फॅशनेबल ब्लाउज घालता येत नाही. तुम्हाला जर हिवाळ्यात देखील सुंदर दिसायचे असेल तर पुढिल टिप्स फॉलो करू शकता.

  • सुंदर दागिने

हिवाळ्यात साडीसह दागिन्यांची योग्य निवड करणे गरजेचे आहे. अधिक सुंदर दिसण्यासाठी साडीसोबत मिक्स आणि मॅच दागिने घालावे. यासाठी फुल स्लीव्हज ब्लाउज असेल तर तुम्ही साडीच्या रंगाशी जुळणारे दागिने घालू शकता. अन्यथा तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कॉन्ट्रास्ट दागिने देखील घालू शकता. यामुळे तुम्ही खूप सुंदर दिसाल.

  • ब्लाउजच्या रंगाशी जुळणारे स्वेटर

जर तुम्हाला साडीमध्ये स्टायलिश दिसायचे असेल तर हिवाळ्यात तुमच्या ब्लाउजच्या रंगाशी जुळणारे स्वेटर खरेदी करावे. लक्षात ठेवा की ते स्लीव्हलेस असावे जेणेकरून स्लीव्हवरील डिझाइन किंवा पॅटर्न चांगल्या प्रकारे हायलाइट करता येईल. ब्लाउजवर स्वेटर घातल्याने थंडीपासून बचाव होईल,.

  • या गोष्टी लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही साडीसोबत स्वेटर घालता तेव्हा तुम्हाला सिंपल वर्क असलेले स्वेटर खरेदी करावे.

लक्षात ठेवा की इतर कोणत्याही रंगाशी जुळवून साडीसोबत स्वेटर घालू नका. यामुळे तुमचा लुक खराब होऊ शकतो.

जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा नेकलाइनची विशेष काळजी घ्या जेणेकरून तो लुक खराब होणार नाही.

साडीवर ओपन हेअरस्टाइल बनवू शकता. तुम्ही हेअर बन देखील बनवू शकता.

जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही हिवाळ्यात सहज स्वेटर घालू शकाल आणि तुम्हाला स्टायलिश लूक मिळेल. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अनेक पर्याय मिळतील. ज्यामुळे तुमचा लुक हटके दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

BJP MGP Alliance: गोव्यात भाजप-मगो युती निश्चित; पण जागावाटपाचा फैसला दिल्ली दरबारी!

Shivaji Maharaj Statue: शिवरायांचा पुतळा हटवणार नाही! गोवा सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

खरी कुजबुज: तिकिटासाठी 'रील'बाजी!

SCROLL FOR NEXT