Holi 2025 Bhang Side Effects in Marathi
पणजी : होळी हा भारतातील एक प्रमुख सण असून तो फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाच्या उत्सवात रंग, गाणी, नृत्य आणि विविध प्रकारचे पदार्थ यांचा समावेश असतो. या सर्वांमध्ये 'भांग' हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. होळीच्या सणादरम्यान भांग मोठ्या प्रमाणात प्यायली जाते. आज आपण भांग म्हणजे काय? भांग पिण्याचे फायदे काय? तसेच, भांग जास्त प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? (Bhang Side Effctes) आणि महत्वाचे म्हणजे या सगळ्याबाबत डॉक्टर काय सांगतात याबद्दल सविस्तररित्या जाणून घेणार आहोत...
चला तर मग पहिल्यांदा भांग म्हणजे काय ते जाणून घेऊया... भांग हा कॅनाबिस वनस्पतीपासून तयार होणारा पदार्थ आहे, जो मेंदूवर परिणाम करुन नशा निर्माण करतो. होळी आणि इतर सणांमध्ये भांगयुक्त ठंडई किंवा खाद्यपदार्थांचा आनंद घेतला जातो. भांग पिण्याचे फायदे देखील आहेत. चला तर भांग पिण्याच्या फायद्याविषयी जाणून घेऊया...
भांगमध्ये CBD (Cannabidiol) आणि THC (Tetrahydrocannabinol) नावाचे संयुगे असतात, जे नैसर्गिक वेदनाशामक आणि तणाव दूर करणारे घटक म्हणून ओळखले जातात. भांग योग्य प्रमाणात घेतल्यास मानसिक तणाव (Mental Stress), चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत करु शकते. काही संशोधनांनुसार, भांग पचनक्रियेस मदत करु शकते. तसेच, झोपेच्या समस्यांवर देखील उपाय ठरु शकते, पण अतिसेवन केल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
जसे भांग सेवनाचे फायदे आहेत तसेच त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. आम्ही गोवा मेडिकल कॉलेजमधील फॉरेन्सिक डॉ. चेतन केरकर यांना भांगाच्या सेवनाविषयी विचारले असता त्यांनी सविस्तर सांगितले. केरकर म्हणाले की, भांगाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास निर्णयक्षमता, समन्वय आणि स्मृतीवर परिणाम होतो. याशिवाय, मुले, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलांनी वैद्यकीय कारणांशिवाय भांग किंवा इतर गांजाजन्य पदार्थांचे सेवन करु नये.
भांगाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
डोकेदुखी आणि चक्कर: भांग घेतल्यानंतर काही वेळाने डोके जड होणे, गरगरणे, किंवा भूक मंदावते.
उलट्या आणि पचन समस्या: काही लोकांना भांग पचत नाही. तसेच, मळमळ, उलट्या होऊ शकतात.
हृदयाचे ठोके वाढणे: रक्तदाब कमी-जास्त होण्याची शक्यता असते.
डोळ्यांमध्ये कोरडेपणा: भांग घेतल्यानंतर डोळे कोरडे पडणे किंवा लालसर होऊ शकतात.
तोंड कोरडे पडणे: शरीरातील पाणी कमी झाल्यास तोंड कोरडे पडते.
एकाग्रता कमी होणे: भांगमुळे विचार करण्याची क्षमता मंदावते आणि निर्णय घेण्याची ताकद कमी होते.
1985 च्या अमली पदार्थ आणि मनोव्यापारसंबंधी पदार्थ अधिनियमाने (NDPS कायदा) "गांजा" ची व्याख्या केली होती. या व्याख्येतून 'भांग'ला वगळले होते. त्यामुळे सणांच्या वेळी भांग मोठ्या प्रमाणावर पिण्याची परंपरा कायम राहिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.