Dry Fruits  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dry Fruits Benefits: 'या' वेळी सुका मेवा खाल्ल्याने होतात फायदे; जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतं

Dry Fruits Benefits: आयुर्वेदात सुक्या मेव्याला आवश्यक पोषक तत्वांचा सर्वात श्रीमंत स्त्रोत मानला जातो.

दैनिक गोमन्तक

Dry Fruits Benefits: सुक्या मेव्याला गुणधर्मांमुळे नेहमीच महत्व प्राप्त झाले आहे. प्रथिने, कॅल्शियम आणि लोहासह शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक त्यात आढळतात.

आयुर्वेदातही सुका मेवा आरोग्यासाठी शक्तिशाली आणि फायदेशीर मानला जातो.

असे मानले जाते की ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरिरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन होते. पचन आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. आयुर्वेदात सुक्या मेव्याला आवश्यक पोषक तत्वांचा सर्वात श्रीमंत स्त्रोत मानला जातो.

बहुतेक लोकांना ड्रायफ्रुट्सचे फायदे, ते खाण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ आणि प्रमाण याबद्दल माहिती नसते, ज्यामुळे त्यांना त्यांचे सर्व फायदे मिळू शकत नाहीत.

बदाम

बदाम हा सर्वात पौष्टिक मानले जाते. विशेषतः वात आणि पित्त दोषांसाठी फायदेशीर आहे. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी महत्वाचे मानले जाते.

खजूर

खजूर गोड आणि उष्ण असतात आणि म्हणूनच वात आणि कफ दोष संतुलित करण्यासाठी खजूर उत्तम असतात. खजूर ऊर्जा आणि पचनास मदत करणारा एक उत्तम स्रोत मानला जातो.

बेदाणे आणि काजू

बेदाणे गोड आणि अंजीर सारखे थंड असतात ज्यामुळे ते पित्त आणि वात दोषांसाठी महत्वाचे मानले जातात. निरोगी त्वचेसाठी बेदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

दुसरीकडे, काजू हे जड आणि गरम मानले जातात, ज्यामुळे ते वात आणि कफ दोषांचे संतुलन राखण्याचे काम करतात.

अक्रोड आणि पिस्ता

अक्रोड हे निरोगी चरबीचा एक चांगला स्त्रोत आहे आणि सर्व दोषांसाठी अक्रोड फायदेशीर मानले जाते. मात्र याचे सेवन कमी प्रमाणात करावा असा सल्ला आयुर्वेदात दिला आहे. हे खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.

पिस्ता गोड आणि किंचित उबदार असतात, ज्यामुळे ते वात आणि कफ दोष संतुलित करतात. हे हृदय( Heart) निरोगी ठेवण्याचे काम करतात.

कधी खावा सुका मेवा?

आयुर्वेदानुसार सुका मेवा खाण्याची वेळ महत्त्वाची असते. आयुर्वेदात सुका मेवा दिवसा म्हणजेच सकाळी उठल्यानंतर किंवा नाश्त्यात किंवा संध्याकाळी नाश्ता म्हणून खावा. रात्री उशिरा ते खाणे टाळा कारण ते पचनास अडथळा आणू शकतात.

महत्वाचे म्हणजे याचे अतिप्रमाण आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. त्यामुळे आपल्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT