Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

7 Tips For Skin Care: चाळीशीनंतर चेहरा ठेवा फ्रेश अन् ग्लोइंग, फॉलो करा या स्किनकेअर टिप्स

जसजसे आपले वय वाढत जाते तसतसा त्वचेवर परिणाम दिसु लागतो त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

7 Tips For Skin Care after 40 Years of age: जसजसे आपले वय वाढच जाते तसतसे आपल्या त्वचेत कोलेजनचे उत्पादन कमी होणे, हार्मोन्समध्ये बदल असे अनेक बदल होतात. याशिवाय सूर्यप्रकाश आणि प्रदूषणाचा प्रभाव त्वचेवर होतो. यामुळे वृद्धत्वाचे प्रमाण वाढु शकते.

याच्या चाळीशीनंतर त्वचेची काळजी घेणे अधिक गांभीर्याने पाळले जाणे आवश्यक आहे.अनेकांना पिंपल्सची समस्या असते. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी तुम्ही काही खास स्किनकेअर टिप्सचा वापर करु शकता.

वयाच्या 40 व्या वर्षी अशी घ्यावी त्वचेची काळजी

  • त्वचा नेहमी स्वच्छ ठेवावी

कोणत्याही स्किनकेअर रुटिनमध्ये त्वचा (Skin) स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जोतो. यासाठी तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेल टिकवून ठेवणारे क्लिंजर वापरणे गरजेचे आहे. क्लीन्सर निवडताना नेहमी लक्षात ठेवा की त्यात हायलुरोनिक अॅसिड आणि ग्लिसरीन आहे. जेणेकरून तुमची त्वचा मऊ आणि मॉइश्चराइज राहील.

अँटी-एजिंग प्रोडक्टस 

तुमच्या वयाच्या 40 व्या वर्षी सुरकुत्या आणि काळे डाग येत असेल तर अँटी-एजिंग प्रोडक्टचा वापर करावा. पण ही बाब लक्षात ठेवा की त्यामध्ये रेटिनॉल, व्हिटॅमिन सी किंवा पेप्टाइड्ससारख्या काही आवश्यक गोष्टी असतात. या सर्व गोष्टी वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात.

सनस्क्रीनचा वापर करावा

सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीचा वापर करावा. जेणेकरून आपली त्वचा निरील. सनस्क्रीन घेताना लक्षात ठेवा की ते SPF 30 किंवा त्याहून अधिक असावे. घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा, पण घरी असलात तरी त्याचा वापर करा. घरात राहून तुम्ही कमी एसपीएफ सनस्क्रीन वापरू शकता.

sunscreen

हायड्रेट स्किन 

वयानुसार तुमची त्वचा पातळ होते आणि आर्द्रता कमी होते. यामुळे त्वचा ड्राय आणि निस्तेज होते. या समस्येसाठी आपली त्वचा आतून आणि बाहेरून हायड्रेट करणे महत्वाचे आहे. दिवसभर भरपूर पाणी प्यावे आणि हायड्रेटिंग स्किनकेअर उत्पादने तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करावा.

डोळ्यांची काळजी घ्यावी

डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा खूप मऊ असते. वृद्धत्वाची चिन्हे डोळ्यांभोवती प्रथम दिसतात. जसे की बारीक रेषा आणि सुरकुत्या पडतात. डोळ्यांखाली हायड्रेटिंग आय क्रीम किंवा सीरम लावून वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करता येते.

Healthy Food

पुरेशी झोप

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे, सूज येऊ शकते. रोज 7-9 तास झोप घेतल्याने त्वचा निरोगी राहते.

सकस आहार

निरोगी, संतुलित आहार घेतल्याने तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर आणि स्वरूपावर लक्षणीय परिणाम होतो. तुमच्या शरीराला आणि त्वचेला आवश्यक पोषक द्रव्ये देण्यासाठी भरपूर फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने खा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि जास्त मीठ किंवा अल्कोहोलचे सेवन टाळा, हे सर्व जळजळ आणि कोलेजनच्या विघटनास कारणीभूत ठरू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT