Benefits of Onion Peels
Benefits of Onion Peels  
लाइफस्टाइल

Benefits of Onion Peels : इथून पुढे कांद्याची साले फेकून देण्याआधी त्याचे फायदे माहित करून घ्या; त्यासाठी हे वाचा

दैनिक गोमन्तक

Benefits of Onion Peels : जगातील प्रत्येक देशाच्या पाककृतींमध्ये कांद्याचा वापर भाज्या, सॅलड किंवा कोणत्याही खाद्यपदार्थात केला जातो. कांद्याचे भाव वाढले तर नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते आणि याचा थेट परिणाम त्यांच्या चवीवर होतो.

कोणतीही पाककृती कांद्याशिवाय अपूर्ण असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, मानवी अन्नामध्ये कांद्याचे खूप महत्त्व आहे. पण कांद्यासोबत त्याची सालेही उपयोगी पडतात, हे जर तुम्हाला कळले, मग तुम्ही काय म्हणाल? अनेकदा आपण कांद्याची साले फेकून देतो, पण जर तुम्हाला त्याचे फायदे माहित असतील तर तुम्ही आजपासून ते फेकून देणार नाही.

चला जाणून घेऊया कांद्याची साल कोणत्या गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते?

  • दृष्टी वाढवते

कांद्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ए आढळते. जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचे काम करते. हे डोळ्यांशी संबंधित आजार जसे रातांधळेपणा दूर ठेवण्याचे काम करते. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे. चहा बनवताना सर्वप्रथम कांद्याची साल उकळून घ्या. आणि नंतर ते गाळून प्या. यामुळे तुमची त्वचाही चांगली होईल आणि चमकही येईल.

  • प्रतिकारशक्ती मजबूत करते

कांद्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त सी देखील आढळते. म्हणून, जर तुम्ही ते चहामध्ये उकळवून किंवा पाण्यात उकळवून प्याल तर ते तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. आणि हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास होणार नाही.

  • निरोगी आणि रेशमी केस

तुमचे केस खडबडीत आणि निर्जीव झाले असतील, तर तुम्ही कांद्याची साल वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम थोडे पाणी घेऊन त्यात कांद्याची साले टाका. आणि तासाभरानंतर त्याच पाण्याने केस धुवा. यामुळे तुमच्या केसगळतीची समस्या दूर होईल.

  • हृदयरोगापासून संरक्षण करते

जर तुम्हाला हृदयविकारापासून दूर राहायचे असेल, तर तुम्ही कांद्याची साल वापरू शकता. सर्व प्रथम, कांद्याची साल नीट स्वच्छ करा आणि नंतर पॅनमध्ये ठेवा. नंतर पाणी घाला. पाणी घातल्यानंतर ते उकळवा. हे पाणी चांगले गाळून मग हे पाणी प्या. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa Today's Live News Update: फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT