Dhanurasana Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dhanurasana: जाणून धनुरासन करण्याचे फायदे

योगाभ्यासातील धनुरासन (Dhanurasana) करताना आपल्या शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे होत असतो.

दैनिक गोमन्तक

योगाभ्यासातील धनुरासन करताना आपल्या शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे होत असतो. त्यामुळेच या आसनाला धनुरासन असं म्हटलं जातं. या आसनामुळे पोट, छाती यांच्याशी निगडीत समस्या दूर होतात. त्यामुळेच हे आसन कसं करावं आणि त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.(Benefits of Dhanurasana)

धनुरासन करण्याचे फायदे

1. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

2. बद्धकोष्ठता, गॅस या समस्या दूर होतात.

3. भूक वाढते.

4. हातापायांना मुंग्या किंवा कंप येत असेल तो त्रास कमी होतो.

5. श्वासोच्छवासाची क्रिया सुरळीत होते.

6. पोटदुखी किंवा पोटासंबंधित तत्सम समस्या दूर होतात.

7. पचनक्रिया सुरळीत होते.

8. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते.

धनुरासन कसं करावं?

1. हे आसन शक्यतो रिकाम्या पोटी करावं.

2. प्रथम पोटावर पालथं झोपा.

3. त्यानंतर पाय गुडघ्यापर्यंत फोल्ड करावेत.

4. गुडघे फोल्ड केल्यानंतर दोन्ही हातांनी पायांची बोटं किंवा पावलं पकडण्याचा प्रयत्न करावा.

5. पायाची बोटं पकडल्यानंतर श्वास घेत हळूहळू छाती जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करावा.

6. छाती व मान वर उचलल्यानंतर केवळ पोटाचा स्पर्श जमिनीला होईल.

7. या स्थितीमध्ये शक्य तितका वेळ रहावं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT