Jackfruit Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jackfruit: फणसाचे गर खाण्याचे फायदे अन् नुकसान, वाचा एका क्लिकवर

फणसाचे घर खाल्याने अनेक फायदे होतात.

Puja Bonkile

Jackfruit: निरोगी आरोग्यासाठी फणस खाणे चांगले असते. कारण फणसामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B6 व व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच फणसामध्ये कॅल्शिअम, लोह, थायमिन यासारखी अनेक महत्वाची पोषकद्रव्य असतात.

  • फणस खाण्याचे जबरदस्त फायदे

फणसामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या दूर होतात. फणस खाल्याने पोट साफ होते, मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात.

  • अँटीऑक्सिडंट्स स्त्रोत

फणसामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे कँसर, हृदयविकार, मधुमेह आणि डोळ्यांच्या मोतीबिंदूसारख्या समस्या होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

  • फायबर

फणसामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते. ज्यांना पोटाचे आजार किंवा पोट साफ होत नसेल तर फणसाची भाजी किंवा गर खावे.

  • अल्सर

अल्सरचा त्रास असलेल्या लोकांनी फणस खावे. फणसात असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे जठरातील अल्सरच्या जखमा भरून येण्यास मदत मिळते.

  • हिमोग्लोबिन वाढते

हिमोग्लोबिन कमी असलेल्या लोकांनी फणसाचे सेवन करावे. कारण फणसामध्ये लोहाचे भरपूर प्रमाण असते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होतो.

  • हाडांसाठी फायदेशीर

फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते. कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यास हाडे मजबुत राहतात. त्यामुळे फणस खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते.

  • गरोदरपणात महिलांसाठी फायदेशीर

फणसात व्हिटॅमिन्स, खनिजतत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात. गरोदरपणात थोड्या प्रमाणातच फणस खावे. गर्भावस्थेत अधिक प्रमाणात फणस खाल्यास पोट बिघडू शकते.

  • रक्तदाब

ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी फणस खाणे फायदेशीर असते. कारण फणसामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.

  • हृदय

फणसामधील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो.

  • फणस खाण्याचे तोटे

ज्या लोकांना फणसाची अॅलर्जी आहे त्यांनी खाऊ नये.

याशिवाय फणस अधिक खाण्यामुळे काहीजणांचे अपचन होऊन पोट बिघडू शकते.

त्यामुळे जुलाब आणि पोटफुगी होणे अशा समस्या होऊ शकतात.

फणस खाण्यामुळे पोट फुगल्यास लिंबूपाणी प्यावे.

  • फणस खाल्यानंतर हे पदार्थ खाऊ नये

  1. फणसाची भाजी किंवा फणस खाल्ल्यानंतर पपईचे सेवन करू नये. यामुळे ऍलर्जी आणि पोटा संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

  2. फणस खाल्यानंतर चुकुनही दूध पिऊ नये. यामुळे पोटात सूज येण्यासोबतच त्वचेवर पुरळ येऊ शकतात. अनेकांना त्वचेवर पांढऱ्या रंगाचे डाग येऊ शकतात.

  3. फणस खाल्ल्यानंतर भेंडीची भाजी देखील खाऊ नये जर, कारण यामुळे पाय दुखू शकतात. याशिवाय अॅसिडिटी वाढू शकते.

  4. अनेक लोकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. पण फणसाची भाजी खाल्ल्यानंतर चुकूनही पान खाऊ नये.

  5. फणस खाल्ल्यानंतर मध खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT