Beetroot Salad Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beetroot Salad: बीटरूट सॅलडचे जबरदस्त फायदे

बीटरूट सॅलडचा आहारात समावेश केल्याने अनेक समस्या दूर होतात.

दैनिक गोमन्तक

शरीरात रक्ताची कमतरता किंवा पुरेसा ऑक्सिजन नसल्यास थकवा येवू शकतो. यामुळे पोषक आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. बीटरूट खाल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात.बीटरूटचे सेवन तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. चला जाणून घेऊया बीटरूट सॅलड बनवण्याची पद्धत आणि ते खाण्याचे फायदे कोणते आहेत.

बीटरूट सॅलड साहित्य:
* बीटरूट 4
* पुदिन्याची पाने 5
* फ्रेश क्रीम 80 ग्रॅम
* मोहरीची पेस्ट 1 टीस्पून
* बदाम 4
* चवीनुसार मीठ
* चवीनुसार काळी मिरी
* कोथिंबीर

* कृती

सर्वात आधी बीट उकळून घ्यावे. नंतर त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावे. यानंतर पुदिन्याची पाने नीट धुवून बारीक कापून कापावी. नंतर एक बाउलमध्ये बारीक चिरलेला बीटरूट, पुदिना, फ्रेश क्रीम, मोहरीची पेस्ट, बदाम, मीठ आणि मिरी पावडर घालून मिक्स करावे. हे मिश्रण चांगले मिक्स करावे. सॅलडवर कोथिंबीर टाकून सजवून जेवताना आस्वाद घ्यावा.

* बीटरूट सॅलडचे जबरदस्त फायदे

* रिकाम्या पोटी बीटरूट खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता कमी होते.

* जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तर बीटरूट सॅलडचे सेवन करावे.

* बीटरूटमध्ये असलेले बीटा कॅरोटीन डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करते.

* उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी बीटरूट फायदेशीर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT