Beauty Tips: स्किनचा टोन ओळखूनच लिपस्टिक खरेदी करा Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Tips: स्किनचा टोन ओळखूनच लिपस्टिक करा खरेदी

तुम्ही नोकरी करत असला (Working Women) असला किंवा कॉलेजला जात असला तर तुमच्या स्किन टोननुसार लिपस्टिक (Lipstick) खरेदी करावी.

दैनिक गोमन्तक

चेहऱ्याचे सौंदर्य (Beauty) वाढवण्यासाठी मेकअप आणि लिपस्टीक महत्वाची आहे. आजकाल बाजारात लिपस्टीक (Lipstick) अनेक रंग उपलब्ध आहेत. पण योग्य रंगाची लिपस्टीक (Lipstick) लावल्यास आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढू शकते. लिपस्टिक खरेदी करतांना अनेक महिला (Women) गोंधळून जातात. आपल्या स्किन टोनला (Skin tone) कोणत्या रंगाची लिपस्टिक शोभून दिसेल यानुसारच खरेदी करावी. जर तुम्ही नोकरी करत असला (Working Women) असला किंवा कॉलेजला जात असला तर तुमच्या स्किन टोननुसार लिपस्टिक (Lipstick) खरेदी करावी.

* गोरा रंग

तुमचा रंग एकदम गोरा असेल तर कोणतीही लिपस्टिक (Lipstick) तुमच्यावर शोभून दिसेल. यात गुलाबी, वाइन लाल, लाईट जांभळा, पीच, यासारखे लिप्स्टिकचे रंग गोरी त्वचा असलेल्या महिलांना शोभून दिसतात. तसेच गोरा रंग असलेल्या महिलांना डार्क गुलाबी, लाल आणि ग्लॉसी लुक देणाऱ्या लिपस्टिक शोभून दिसतात.

* सावळा रंग

जर तुमचा रंग सावळा असेल तर तुम्ही डार्क पिंक, ब्लड रेड, ब्रोज, राइप ऑरेंज, सिनामन रंगाची लिपस्टिक (Lipstick) लावावी. त्वचेचा सावळा रंग असलेल्या महिलांनी डार्क लाल, ऑरेंज आणि डार्क कॉफी रंग असेलेल्या लिपस्टिक लावणे टाळावे.

* जाणून लिपस्टिक लावण्याचा योग्य मार्ग

आपल्या स्किन टोननुसार (Skin tone) योग्य ती लिपस्टिक (Lipstick) खरेदी केल्यानंतर ओठांवर लीप बाम लावावे. नंतर हलक्या हाताने मसाज करावी. यानंतर प्राइमार किंवा फाउंडेशयन लावावा. जेणेकरून लिपस्टिक ओठांवर बराच काळ टिकेल. लिपस्टिकला मॅच होणारे लीप लायनर लावावा. मग ब्रशच्या मदतीने किंवा हाताच्या बोटांचा वापर करून लिपस्टिक लावावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT