banana leaf Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Banana Leaf Health Benefits: केळीच्या पानावर जेवण्याचे 'हे' आहेत फायदे

Banana Leaf Health Benefits: त्यामुळे केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

दैनिक गोमन्तक

Banana Leaf Health Benefits: भारतीय परंपरेत केळीच्या पानाला महत्व आहे. केळी अनेकप्रकारे जसे उपयोगी येते तसेच केळीच्या पानाचेदेखील आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अलिकडे केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत कमी झाली असली तरीही काही हॉटेल्समध्ये केळीच्या पानावर जेवण वाढण्याचा खास प्रकार दिसून येतो.

अनेकदा काही खास प्रसंगी कित्येक घरात केळीच्या पानावर जेवण करण्याची पद्धत आजही जिवंत आहे. चला तर जाणून घेऊयात केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे काय आहेत.

  • नैसर्गिक जंतुनाशक

केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात जे अन्नातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

  • प्लास्टिकला उत्तम पर्याय

प्लास्टिक किंवा थर्माकोल प्लेट्सच्या तुलनेत केळीची पाने विषारी नसतात, ज्यामुळे हानिकारक रसायने अन्नामध्ये आढळत नाहीत, यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

  • पचनक्रिया सुरळित होते

पानांवर अन्न खाल्ल्याने पचनक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो. केळीच्या पानांमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल पाचक एन्झाईम्सचे उत्पादन वाढवतात, जे चांगले पचन आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करतात.

  • पौष्टिक मूल्य

केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जेव्हा केळीच्या पानावर अन्न ठेवले जाते तेव्हा त्यातील काही पोषक घटक वाढतात.

  • इको फ्रेंडली

डिस्पोजेबल प्लेट्सचा नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानांचा वापर करणे हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. यामुळे प्लॅस्टिक किंवा फोम प्लेट्सची गरज कमी होते, ज्यामुळे जमीन प्रदूषण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT