Bakari Eid 2023: बकरीद म्हणून ओळखली जाणारी ईद उल अजहा या वर्षी 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या सणाला त्यागाचा सण असेही म्हणतात. या खास प्रसंगी लोक वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ घरी बनवतात.
बकरीईदनिमित्त वेगवेगळ्या बिर्याणीचा आश्वाद घेतला जातो. बिर्याणी अनेक लोकांना प्रिय असते. तसेच बिर्याणीचे जगभरात अनेक प्रकारे बनवले जातात. चला तर मग जाणून घेऊया बिर्याणीचे प्रसिद्ध प्रकार कोणते आहेत.
बकरीद का साजरी केली जाते
मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईद देशभरात 29 जूनला उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून त्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. बकरी ईद हा सण मुस्लिम धर्मातील लोक मिठी ईदच्या 70 दिवसांनी म्हणजेच ईद उल फित्र नंतर साजरा करतात. हा त्यागाचा सण आहे आणि तो अल्लाहच्या भक्तीचे उदाहरण आहे.
हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ईद-उल-अजहा साजरी केली जाते. हजरत इब्राहिमने अल्लाहच्या आज्ञेवर निष्ठा दाखवण्यासाठी आपला मुलगा इस्माईलचा बळी देण्याचे मान्य केले होते.
हजरत इब्राहिम जेव्हा आपल्या मुलाचे बलिदान देण्यासाठी पुढे निघाले तेव्हा देवाने त्यांची निष्ठा पाहून इस्माईलच्या बलिदानाचे दुंबेच्या बलिदानात रूपांतर केले. इस्लामच्या धार्मिक श्रद्धेनुसार हजरत इब्राहिम अल्लाहचे पैगंबर होते.
चिकन बिर्याणी
ही भारतातील सर्वात जास्त खाल्ल्या जाणार्या बिर्याणींपैकी एक आहे. हे बनवायला खूप सोपे आहे, जे खातात त्यांना त्याच्या चवीचे वेड होतात. चिकन बिर्याणी अनेक प्रकारे तयार केली जाते.
लखनवी बिर्याणी
लखनौमध्ये भात आणि मांसाहारी पदार्थ मिसळून आसेवाद घेतला जातो. हा उत्तर भारतातील आवडत्या पदार्थांपैकी एक आहे.
कोलकाता बिर्याणी
कोलकात्यात खाल्ल्या जाणाऱ्या बिर्याणीची चव मसालेदार असते, ज्यामध्ये अनेक प्रकारचे मसाले समाविष्ट असतात. त्याची चव खूप चांगली आहे.
सिंधी बिर्याणी
सिंधमधील प्रसिद्ध बिर्याणीची चवही चटपटीत असते. जरी सिंध आज पाकिस्तानात आहे, तरीही भारतातील लोक सिंधी बिर्याणी बनवतात आणि त्याचा आस्वाद घेतात.
मेमोनी बिर्याणी
हे सिंधी बिर्याणीसारखेच आहे यामध्ये बटाटे, मिरची आणि मसाले आणि टोमॅटो वापरले जातात. हैदराबादी बिर्याणी दोन प्रकारात उपलब्ध आहे, एक पक्की आणि दुसरी कच्ची. या दोन्हीमध्ये मांस वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जाते.
मलबार बिर्याणी
केरळच्या मलबार भागातील प्रसिद्ध मलबार बिर्याणी देखील लोकांची आवडती मानली जाते. हिरवी मिरची, दालचिनी, लवंगा, विलायची अशा अनेक गोष्टींपासून ही तयार केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.