Hair Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayurvedic Tips For Hair Fall: तुपात 'या' 2 गोष्टी मिक्स करून लावल्यास केस गळतीची समस्या होईल कमी

आयुर्वेदात केस गळणे कमी करण्यासाठी खास उपाय सांगितले आहेत.

Puja Bonkile

Ayurvedic Tips For Hair Fall: सध्या केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. फक्त मुलींमध्येच नाही तर मुलांनाही ही समस्या जाणवते. अनेक लोक महागडे प्रोडक्ट वापरतात पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही.

आयुर्वेदानुसार केस गळण्याची अनेक कारणे आहेत. जसे की अनुवांशिक समस्या, जास्त प्रमाणात मीठ, साखर, मिरची, मसाले असलेले पदार्थ, ज्यामुळे शरीरातील पित्तदोष वाढतो, हार्मोनल बदल, चुकीची लाइफस्टाइल, तणाव, झोप न लागणे, धूळ किंवा प्रदूषणात राहणे यासारखे अनेक कारणे आहेत.  

केसगळती रोखण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय केल्यास केस गळणे थांबवू शकता. 

तुप आणि आवळा पावडरचा उपाय

  • साहित्य

तूप - 1/2

आवळा पावडर- 1/2

साखर - 1/2

हे सर्व साहित्य एकत्र करून दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी सेवन करावे. हे मिश्रण नीट चावून खावे. यामुळे केस गळती कमी होऊ शकते.

  • आयुर्वेदिक आहार

केसांची वाढ आणि केसांचे आरोग्य हे आहारावर देखील अवलंबुन असते. म्हणून निरोगी आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात केसांसाठी जीवनसत्त्वांपासून प्रथिनांपर्यंत सर्व महत्त्वाच्या पोषक घटकांचा समावेश असावा. तुम्हाला जर केस गळती कमी करायची असेल तर या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामध्ये मूग डाळ, आवळा, काकडी, ताक, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, तीळ, जिरे, नारळ, मेथी, डाळिंब, बडीशेप, पालेभाज्या, अंडी आणि व्हिटॅमिन बी 12 युक्त पदार्थांचे सेवन करावे.

  • आयुर्वेदानुसार केसांची कशी काळजी घ्यावी

केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदिक तेलाने केसांच्या मुळात नियमित मसाज करावी.

केसांच्या मुळा कमजोर होऊ देऊ नका.

केसांच्या वाढीशी पोषक पदार्थांचा आहारात समावेश करावा.

7-8 तासांची पूर्ण झोप घ्यावी. झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना मसाज करावी.

नियमितपणे योगासने करावी. त्यामुळे डोक्याकडे रक्ताचा प्रवाह वाढतो.तसेच केसांचे आरोग्य देखील चांगले राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT