Ayurvedic Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayurvedic Tips: हिवाळ्यात आजार राहतील दूर, 'या' आयुर्वेदिक पदार्थांचे करा सेवन

यामुळे जेव्हा ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडी पडायला लागते तेव्हा आयुर्वेदानुसार कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Ayurvedic Tips: बदलत्या हवामानाबोरोबर आपण आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलल्या पाहिजेत. थंडी वाढू लागली आहे आणि लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ लागली आहे. यामुळे जेव्हा ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडी पडायला लागते तेव्हा आयुर्वेदानुसार कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.

आयुर्वेदानुसार थंडीच्या सुरूवातीला काही नियमांचे पालन केल्यास कोणतेही आझर होणार नाही.

तुप

हिवाळ्यात तुप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुमच्या आहारात तूप आणि खोबरेल तेलाचा समावेश करावा.

दालचिनी

या हिवाळ्यात चहा बनवताना त्यात 1/4 तुकडा दालचिनी घालावा. यामध्ये डिमुलसेंट नावाचा पदार्थ असतो. यामुळे कफचा त्रास कमी होतो.

मसाल्यांचा वापर

मीठ, आलं, विलायची, दालचिनी, लवंगा, काळे मिरी, लसूण, कांदा आणि ओरेगॅनो यांसारख्या मसाल्यांचा मध्यम प्रमाणात वापर केल्यास जड पदार्थ पचण्यास मदत होते.

पदार्थ गरम करून खावे

तुम्ही जर सॅलेड खात असाल तर आता गरम सूप प्यायला सुरूवात करावे. अंडी, तूप, दूध, भाज्या, नट आणि बिया इत्यादि शरीरात संरक्षणात्मक, इन्सुलेट चरबीचा थर तयार करण्यास मदत करतात.

काळे मिरे

काळे मिरे चहामध्ये टाकून प्यायल्यास सर्दी आणि पचन सुलभ होते. तुम्ही तुमच्या सकाळच्या चहामध्ये दालचिनीचे मिश्रण देखील करू शकता. काळे मिरे, हळद आणि दालचिनी या दिवसांमध्ये खाणे फायदेशीर असते.

हळदीचे दुध

हळदीचे दुध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. रात्री झोपतांना हळदीचे दुध प्यायल्यास हाडांचे आरोग्य निरोगी राहते.

जायफळ

या दिवसांमध्ये शांत झोप येण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर जायफळ टाकावे. यामुळे निद्रानाश दूर होईल आणि वातची समस्या दूर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT